Pan Card : पॅन कार्ड सांभाळा!

Cyber Fraud : मुंबईतील एका वयस्कर गृहिणीला एका मालमत्ता व्यवहारात तिच्या वाट्याला आलेल्या एक कोटी ३० लाख रुपयांवर कर भरा, अशी नोटीस आली.
alert pan card fraud know all the details of your pan cyber fraud
alert pan card fraud know all the details of your pan cyber fraud Sakal

- शिरीष देशपांडे

प्रचलित प्राप्तिकर कायद्यानुसार अनेक आर्थिक व्यवहारांसाठी परमनंट अकाउंट नंबर (पॅन) असणे आवश्यक आहे. असे व्यवहार करणाऱ्या निर्धारित संस्था किंवा ज्यांच्यामार्फत व्यवहार झाले अशा सर्वांनी विहित मुदतीत झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याला कळवणे बंधनकारक आहे.

प्राप्तिकर खाते करदात्याच्या वार्षिक विवरणात ही सर्व माहिती आहे का? त्यावरील प्राप्तिकर भरला आहे का, याची पडताळणी करते आणि कर भरला नसल्यास पुढील कारवाई करते. सर्व नागरिकांना पॅन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे.

दुसऱ्याचा ‘पॅन’ वापरून सायबर गुन्हा

राजस्थानमधील एका छोट्या दुकानदाराला त्याच्या परमनंट अकाउंट नंबरवर (पॅन) १२ कोटी २३ लाख रुपयांचा व्यवहार झाला असून, त्यावरचा प्राप्तिकर भरा, अशी नोटीस आली. वास्तविक त्या दुकानदाराची कमाई महिन्याला केवळ १० हजार रुपये आहे. हा व्यवहार त्याचा नाही, हे तपासून या प्रकरणाचा पुढील त्याचा तपास सुरू आहे.

वयस्कर गृहिणीला कर भरण्याची नोटीस

मुंबईतील एका वयस्कर गृहिणीला एका मालमत्ता व्यवहारात तिच्या वाट्याला आलेल्या एक कोटी ३० लाख रुपयांवर कर भरा, अशी नोटीस आली. तिचा ‘पॅन’ वापरून दुसऱ्याच कोणीतरी तो व्यवहार केला आहे. ही बाब तिला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पटवून द्यावी लागली, तेव्हा कोठे तिची या प्रकरणातून सुटका झाली.

सतर्कता बाळगा

  • प्राप्तिकर खाते प्रत्येक पॅन कार्ड असलेल्या व्यक्तीला ‘वार्षिक माहितीपत्रक’ (Annual Information Statement : AIS) उपलब्ध करून देते. यात प्रत्येक तिमाहीत त्या पॅन कार्डवर झालेले व्यवहार उपलब्ध असतात. ते सर्व व्यवहार आपलेच आहेत ना, हे कर सल्लागाराच्या मदतीने तपासून पाहावे. आपण न केलेले व्यवहार दिसत असतील, तर तत्काळ प्राप्तिकर खात्याला कळवणे गरजेचे आहे.

  • सिबिल, इक्विफॅक्ससारख्या क्रेडिट स्कोअर साइटवर जाऊन आपल्या नावावर दुसऱ्या कोणी कर्ज घेतलेले नाही ना? याची तपासणी करावी.

  • ज्या संस्था प्राप्तिकर खात्याला वेळोवेळी माहिती देतात, त्यांनी संबंधित पॅन कार्डची माहिती घेताना, माहितीत उल्लेख केलेला परमनंट अकाउंट नंबर कोणाचा आहे? याची खातरजमा करायची गरज आहे.

  • गरज नाही तिथे पॅन कार्ड किंवा त्याची प्रत देऊ नये. उदा. जिथे फक्त फोटोची गरज आहे, तिथे वाहन परवान्याची कॉपी द्यावी.

  • आपल्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर, त्या व्यक्तीचा परमनंट अकाउंट नंबर (पॅन) रद्द करावा.

  • आपल्या नावावर असा कोणता मोठा व्यवहार केलेला आढळल्यास, https://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी; तसेच स्थानिक पोलिस चौकीत रीतसर तक्रार दाखल करावी. प्राप्तिकर खात्याच्या तपासणीवेळी हा पुरावा उपयोगी पडू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com