Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक; म्हणाल्या...

Nirmala Sitharaman: ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३’च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSakal
Updated on

Nirmala Sitharaman: प्राप्तिकर विभागाने ऑगस्टमध्ये जाहीर केलेल्या आकडेवारी-वरून भारतीय अर्थव्यवस्थेतील करप्रणाली अधिक व्यापक झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे केले.

‘ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३’च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. ‘‘प्रत्येक टॅक्स स्लॅबमधील करदात्यांच्या संख्येत किमान तीन पट वाढ झाली आहे. करविवरणपत्र भरण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे,’’ असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सीतारामन पुढे म्हणाल्या, ‘‘देशात २०४७ मध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा ४५ टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे करपात्र उत्पन्न असणाऱ्यांची संख्यादेखील सध्याच्या २२.५ टक्क्यांवरून ८५.३ टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे वर्ष २०४७ मध्ये ४८.२ कोटी लोक प्राप्तिकर भरणारे असतील.

आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये ही संख्या सात कोटी होती. देशात गेल्या चार वर्षांच्या कालावधीत डी-मॅट खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये ती ४.१ कोटी होती, २०२२-२३ मध्ये ही संख्या दहा कोटींपर्यंत वाढली आहे. ’’

Nirmala Sitharaman
T+1 Settlement नंतर सेबी आणणार नवीन नियम, गुंतवणूकदारांना असा होणार फायदा

‘‘म्युच्युअल फंड आणि ‘एसआयपी’द्वारे होणाऱ्या गुंतवणुकीतही सातत्याने वाढ होत असून, ‘एसआयपीं’ची विक्रमी संख्या नोंदवली जात आहे. म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीने जुलै २०२३ मध्ये १५,२४५ कोटी रुपयांची सर्वकालीन उच्चांक गाठला आहे.’’ असेही त्या म्हणाल्या. डिजिटल साक्षरतेचे महत्त्वही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Nirmala Sitharaman
PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे महागाईवर मोठं वक्तव्य; म्हणाले, महागाई ही जगासमोरील...

DMAT खात्यांची संख्या 10 कोटींवर पोहोचली:

चार वर्षांच्या कालावधीत DMAT खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे, २०१९ मध्ये ४.१ कोटी वरून २०२२-२३ मध्ये १० कोटी झाली आहे. म्युच्युअल फंड आणि एसआयपीची विक्रमी संख्या नोंदवली जात आहे. म्युच्युअल फंड जुलै २०२३ मध्ये १५,२४५ कोटी रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.