Amara Raja Energy : अमरा राजा एनर्जीच्या शेअर्समध्ये 2 दिवसांत 21% वाढ, शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला...

Amara Raja Energy & Mobility Limited : गुंतवणूकदारांनी अमरा राजा एनर्जी शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी केले पाहिजे असा सल्ला मार्केट एक्सपर्ट्स देत आहेत.
Amara Raja Energy & Mobility Limited
Amara Raja Energy & Mobility LimitedSakal
Updated on

अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडच्या (Amara Raja Energy) शेअर्समध्ये बुधवारी 7 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, ही वाढ त्यांना कायम ठेवता आली नाही. हा शेअर बीएसईवर 1.26 टक्क्यांच्या वाढीसह 1667.75 रुपयांवर बंद झाला.

शेअरने इंट्राडेमध्ये 1774.90 रुपयांच्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. बाजार बंद होण्याच्या वेळी, कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 21 टक्क्यांनी नेत्रदीपक वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप 30473.72 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांक 599 रुपये आहे.

गुंतवणूकदारांनी अमरा राजा एनर्जी शेअर्स लाँग टर्मसाठी खरेदी केले पाहिजे असा सल्ला मार्केट एक्सपर्ट्स देत आहेत. मार्केट एक्सपर्ट अमित त्रिवेदी यांनी गुंतवणूकदारांना 1,500-1,550 च्या दरम्यान हळूहळू शेअर्स जमा करण्याचा सल्ला दिला.

अमरा राजा एनर्जी शेअर्सना त्यांचा 2015 चा उच्चांक ओलांडण्यासाठी जवळपास नऊ वर्ष लागली. पण आता मात्र हा शेअर 2000-2100 रुपयांच्या पातळीवर जाण्याची तज्ज्ञांना विश्वास आहे.

बॅटरी निर्मात्याने अलीकडेच लिथियम-आयन फॉस्फेट (LFP) टेक्नोलॉजीत प्रवेश मिळवण्यासाठी गोशनच्या उपकंपनीसोबतटेक्निकल लायसन्स ऍग्रीमेंट (TLA) केले आहे. हे ली-आयन (Li-ion) सेल मॅन्युफॅक्चरिंग स्पेससाठी अमराच्या धोरणाशी सुसंगत आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने अमरा राजाला 'न्यूट्रल' रेटिंग दिले होते, ज्याचे टारगेट 1,210 प्रति शेअर होते. ब्रोकरेजने गोशानसोबत कंपनीच्या अलीकडील तांत्रिक परवाना कराराचे सकारात्मक पाऊल म्हणून वर्णन केले.

या भागीदारीमुळे अमरा राजाच्या गिगाफॅक्टरीच्या विकासाला गती मिळेल आणि कंपनीचे 16GWh क्षमतेचे लक्ष्य गाठण्यासाठी गुंतवणूकदारांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल अशी आशा आहे. देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा विश्वास आहे की गोशानसह TLA कंपनीला LiB बॅटरी विकसित करण्यात आणि व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत करेल. तर कोटकने 1100 रुपये प्रति शेअरच्या टारगेटसह स्टॉकवर आपली 'सेल' रेटींग कायम ठेवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.