शेअर बाजारात बरेचसे गुंतवणूकदार नेहमी पेनी स्टॉकच्या शोधात असतात जे त्यांना लाँग टर्ममध्ये मल्टीबॅगर परतावा देऊ शकतील. गेल्या काही वर्षांत एनएसईवर गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणारा एक पेनी स्टॉक म्हणजे कम्फर्ट इनटेक (Comfort Intech).
या ट्रेडिंग आणि पुरवठा कंपनीने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना 3000 टक्क्यांहून अधिक उत्कृष्ट परतावा दिला आहे. एप्रिल 2020 मध्ये कम्फर्ट इन्टेकच्या शेअरची किंमत फक्त 22 पैसे होती. पण एनएसईवर हा शेअर आता 10.06 रुपयांवर व्यवहार करत आहे.
याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2020 मध्ये या शेअरमध्ये 5,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 5,000 रुपयांचे मूल्य 2 लाख 50 हजार झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10,000 रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 5 लाख रुपये झाले असते.
कम्फर्ट इनटेक कंपनीची स्थापना 1994 मध्ये झाली. पूर्वी त्याचे नाव कम्फर्ट फिनव्हेस्ट लिमिटेड होते. 2000 साली कंपनीने नवीन सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन मिळवण्यासाठी आपले नाव कम्फर्ट इनटेक लिमिटेड (CIL)असे बदलले. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरच्या किमतीत अंदाजे 271 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे, गेल्या तीन महिन्यांत 25.12 टक्के परतावा दिला आहे. तर एका महिन्यात 11.90 टक्के परतावा मिळाला. सध्या हा शेअर 10.06 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 12.28 रुपये आहे, जो 27 फेब्रुवारी 2024 रोजी पोहोचला. कंपनीचे मार्केट कॅपिटल 321 कोटी आहे.
चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 46.03 कोटीचा महसूल नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीपेक्षा हे प्रमाण 25.63 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, तिमाही आधारावर त्याच्या महसुलात 71.82 टक्के वाढ झाली आहे. यापूर्वी, आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 142.4 कोटीचा महसूल नोंदवला होता, तर तिचा नफा 8 कोटी होता. जर आपण शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर कंपनीचे 57.46 टक्के शेअर्स प्रमोटर्सकडे आहेत, तर 42.54 टक्के शेअर्स पब्लिककडे आहेत.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.