ED in Action: ईडीने ई-कॉमर्स क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कडक कारवाई केली आहे. देशभरात 20 हून अधिक ठिकाणी या कंपन्या आणि त्यांच्या उपकंपन्यांविरुद्ध शोधमोहीम राबवली जात आहे.
दिल्ली, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये होत असलेल्या या कारवाईचा उद्देश परकीय गुंतवणूक आणि एफडीआय नियमांचे संभाव्य उल्लंघन तपासणे हा आहे. ईडीच्या कारवाईमुळे ई-कॉमर्स क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) या कंपन्यांवर भारतीय स्पर्धा नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि त्यांच्या प्लॅटफॉर्मवर केवळ विशिष्ट विक्रेत्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप केला आहे.