मुंबई : महाराष्ट्रातील लघू आणि मध्यम उद्योजक किंवा विक्रेत्यांसाठी ‘ॲमेझॉन’ने विविध उपक्रम आणि नावीन्यपूर्ण कल्पना सादर केल्या आहेत. विक्रेत्यांच्या उत्पन्नात वाढ आणि ग्राहकांना अधिक चांगल्या किमतीत वस्तू सादर करता येण्यासाठी किराणा माल, फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या श्रेणींमध्ये विक्रीशुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे.
यामुळे विक्रेत्यांना दिवाळीतील खरेदीच्या काळात त्यांची विक्री अधिकाधिक करण्याची आणि सणासुदीच्या हंगामानंतरही व्यवसायवाढ चालू ठेवण्याची संधी मिळणार आहे.ॲमेझॉन इंडियाच्या सेलिंग पार्टनर सर्व्हिसेसचे संचालक अमित नंदा यांनी ही माहिती दिली.
सणासुदीचा काळ हा महाराष्ट्रातील लघू आणि मध्यम उद्योगांसाठी ई-कॉमर्सद्वारे त्यांचा ऑनलाइन व्यवसाय वाढविण्याची मोठी संधी असते. या वर्षी राज्यातील १,८०,००० पेक्षा जास्त विक्रेते ‘ॲमेझॉन’वर त्यांची उत्पादने नोंदवतील आणि संपूर्ण देशातील त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोचतील.
वाढती मागणी आणि विशेष सवलती यांचा लाभ घेऊन हे विक्रेते त्यांच्या विक्रीत वाढ करू शकतील व नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील. विक्रीशुल्कात केलेली कपात, तसेच आम्ही सादर केलेले इतर उपाय आणि वैशिष्ट्ये यांमुळे विक्रेत्यांना सणासुदीच्या काळात व त्यानंतरही मोठे यश मिळू शकेल, याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत ‘ॲमेझॉन’ने महाराष्ट्रात आणि देशभरात मजबूत पायाभूत सुविधा तयार करण्यात गुंतवणूक केली आहे. पायाभूत सुविधांमधील या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील विक्रेत्यांना संपूर्ण देशभरातील ग्राहकांपर्यंत पोचण्यास मदत होत आहे, तसेच यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे नंदा यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.