Amazon Service: अ‍ॅमेझॉनने केला विक्रम; 4,500 फूट उंचीवर डिलिव्हरी पोहोचवणारी बनली पहिली कंपनी

Amazon Service: ॲमेझॉनने उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्गम गाव गजोलीमध्ये डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हिमालय पर्वत रांगेत 4,500 फूट उंचीवर असलेल्या गजोली येथे महर्षि आश्रमात डिलिव्हरी पॅकेज वितरित करणारी ही पहिली कंपनी बनली आहे.
Amazon starts delivery service in Uttarakhand's remote village at 4,500 feet
Amazon starts delivery service in Uttarakhand's remote village at 4,500 feetSakal
Updated on

Amazon Service: ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्गम गाव गजोलीमध्ये डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हिमालय पर्वत रांगेत 4,500 फूट उंचीवर असलेल्या गजोली येथे महर्षि आश्रमात डिलिव्हरी पॅकेज वितरित करणारी ही पहिली आणि एकमेव ई-कॉमर्स कंपनी बनली आहे. (Amazon starts delivery service in Uttarakhand's remote village at 4,500 feet)

आश्रम परिसरात आणि आजूबाजूला कोणतीही दुकाने किंवा डिलिव्हरी पर्याय नाहीत. या ठिकाणी ऑर्डर पोहचवणे केवळ अवघडच नाही तर यासाठी खूप वेळही लागतो. अशा परिस्थितीत या क्षेत्रातील कोणत्याही कंपनीकडून उत्पादनांची डिलिव्हरी पोहचवणे ही खूप अवघड गोष्ट आहे.

करुणा शंकर पांडे, संचालक (अमेझॉन लॉजिस्टिक्स), ॲमेझॉन इंडिया, म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवान, सुरक्षित आणि चांगले नेटवर्क तयार करून, देशभरात आमचे नेटवर्क वाढवले आहे. पायाभूत सुविधा आणि वितरण तंत्रज्ञानामध्ये मोठी वाढ झाली आहे."

Amazon starts delivery service in Uttarakhand's remote village at 4,500 feet
Google Employee: गुगलचा कर्मचारी सोडत होता नोकरी, थांबवण्यासाठी कंपनीने वाढवला 300 टक्के पगार

कंपनीने भारतात सुरुवातीपासूनच अशी अनेक पावले उचलली ज्यामुळे लोकांचा विश्वास जिंकता आला. भारतात ऑनलाइन खरेदीबाबत लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. परंतु कंपनीने लोकांची मनस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन पॉलिसी आणली. त्यामुळे ग्राहकांसाठी रिटर्न आणि रिफंड पॉलिसी अतिशय सोपी झाली.

ॲमेझॉनने खासकरून भारतीय ग्राहकांसाठी लाइट ॲप्लिकेशनही लाँच केले आहे. यासोबतच त्यांच्या आवडत्या भाषेत खरेदीचा पर्याय देऊन सर्वांना सहजपणे स्वतःशी जोडले. हे सर्व उपाय देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी प्रभावी ठरले.

Amazon starts delivery service in Uttarakhand's remote village at 4,500 feet
Byju's Crisis: 'बायजू' कंपनीवर आली ऑफिसला टाळं लावण्याची वेळ; आर्थिक संकटामुळे घेतला निर्णय

2015 मध्ये प्रथमच ॲमेझॉनने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशात 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सुरू केला, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. ॲमेझॉनने 2016 मध्ये भारतात 'प्राइम' लाँच केले, ज्यामुळे ग्राहकांना अनेक सुविधा मिळू लागल्या. ॲमेझॉन प्राइम मेंबरशिपद्वारे वस्तूंची लवकर डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी चार्जेस भरण्याचे ओझेही कमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.