Amazon Jobs: अ‍ॅमेझॉन देणार 20 लाख नोकऱ्या; सीईओ अँडी जॅसी यांची मोठी घोषणा

देशाचे आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
Amazon Jobs
Amazon JobsSakal
Updated on

Amazon Jobs: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौर्‍यामुळे भारतात अब्जावधी डॉलर्सची गुंतनणूक झाली आहे. आता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतात 4-5 लाख नव्हे तर 20 लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. देशाचे आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट केले

आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, अॅमेझॉन इंडियाकडून मोठ्या गुंतवणुकीसाठी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. या अंतर्गत 2030 पर्यंत भारतात 26 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 20 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया सोबतच अमेरिका-भारत तंत्रज्ञान भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक पाऊल ठरेल.

अँडी जॅसी यांनी दिले मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन

ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या अधिकार्‍याने सांगितले की, कंपनी भारतात अतिरिक्त 15 अब्ज डॉलर गुंतवण्याची योजना आखत आहे, ज्यामुळे कंपनीची भारतातील एकूण गुंतवणूक 26 अब्ज डॉलर होईल.

अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडी जॅसी म्हणाले की कंपनीने भारतात आधीच 11 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे.

Amazon Jobs
RBI Governor: महागाई आणि EMI कधी कमी होणार? आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले...

अॅमेझॉन भारतात भागीदारी करण्यास उत्सुक

ते शुक्रवारी म्हणाले होते की, मी पंतप्रधान मोदींसोबत खूप चांगले आणि अर्थपूर्ण संभाषण झाले आणि मला वाटते की आमची अनेक उद्दिष्टे समान आहेत. Amazon भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

आम्ही आतापर्यंत 11 अब्ज डॉलर गुंतवले आहेत आणि आणखी 15 अब्ज डॉलर गुंतवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे भागीदारीच्या भविष्याबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत.

परराष्ट्र मंत्रालयानेही केले ट्विट

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील ट्विट केले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Amazon चे चेअरमन आणि CEO सोबत अर्थपूर्ण भेट घेतली.

परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, "भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रात आणि ई-कॉमर्स क्षेत्रात Amazon सोबत सहकार्य वाढवण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली." भारतातील एमएसएमईच्या डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी अॅमेझॉनच्या पुढाकाराचे मोदींनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.