Paytm: पेटीएम वॉलेटवर अंबानींची नजर? 'या' अहवालानंतर जिओ फायनान्शियलच्या शेअर्समध्ये 13 टक्के वाढ

Paytm wallet: अडचणीत सापडलेली वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँकेशी बोलणी करत आहे. या बातमीनंतर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स सोमवारी बीएसईवर 13% वाढून 263.30 रुपयांच्या दिवसातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले.
Ambanis eyeing Paytm wallet Jio Financial shares jump 13 percent on report saying
Ambanis eyeing Paytm wallet Jio Financial shares jump 13 percent on report saying Sakal
Updated on

Paytm wallet: अडचणीत सापडलेली वन 97 कम्युनिकेशन्स म्हणजेच पेटीएम आपला वॉलेट व्यवसाय विकण्यासाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँकेशी बोलणी करत आहे. या बातमीनंतर, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स सोमवारी बीएसईवर 13% वाढून 263.30 रुपयांच्या दिवसातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले.

या प्रकरणाची माहिती असलेल्या फिनटेक आणि बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देऊन, द हिंदू बिझनेस लाइनने सांगितले की, पेटीएमचा वॉलेट व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी HDFC बँक आणि जिओ फायनान्शियल आघाडीवर आहेत.

विजय शेखर शर्मा यांची टीम गेल्या नोव्हेंबरपासून जिओ फायनान्शिअलशी चर्चा करत आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने बंदी आणण्यापूर्वी एचडीएफसी बँकेशी चर्चा सुरू होती, अहवालानुसार, जिओ पेटीएम पेमेंट्स बँक घेण्याचा प्रस्ताव देऊ शकते.

Ambanis eyeing Paytm wallet Jio Financial shares jump 13 percent on report saying
RBI MPC: आरबीआय व्याजदर वाढवणार की कमी करणार...? अर्थमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

RBI ने पेटीएम पेमेंट बँकेला ग्राहकांच्या खात्यांमध्ये कोणत्याही ठेवी किंवा क्रेडिट्स स्वीकारण्यास प्रतिबंध केल्यापासून पेटीएम अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. RBI देखील संभाव्य मनी लाँड्रिंग आणि KYC उल्लंघनासाठी पेटीएमचा बँकिंग परवाना रद्द करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जाते.

पेटीएममध्ये मनी लाँड्रिंगचा संशय

पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत आरबीआयची चिंता केवळ नियमांकडे दुर्लक्ष करण्यापुरती मर्यादित नाही. तर ‘पेटीएम वॉलेट’ च्या व्यवहारांबाबतही आहे.

Ambanis eyeing Paytm wallet Jio Financial shares jump 13 percent on report saying
RBI MPC: आरबीआयची बैठक 6 फेब्रुवारीपासून होणार सुरू, कर्ज स्वस्त होणार का? काय आहे तज्ज्ञांचे मत

डिसेंबर 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, पेटीएम वॉलेटच्या सुमारे 3.3 कोटी ग्राहकांनी 8,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 24.72 कोटी व्यवहार केले आहेत. पैसे हस्तांतरित करण्यासाठी 2.07 कोटी व्यवहार केले गेले, त्यांचे एकूण मूल्य 5,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.