American Professionals Accused TCS: भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) वर अमेरिकन कर्मचाऱ्यांनी भेदभाव होत असल्याचा आरोप केला आहे. 20 अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या समूहाने TCS वर त्यांच्या वंश आणि वयाच्या आधारावर त्यांच्याशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, यासंबंधीची तक्रार अमेरिकन Equal Employment Opportunity आयोगाकडे करण्यात आली आहे. TCS ने अनुभवी अमेरिकन कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि त्यांची काही कामे तात्पुरत्या कामाच्या व्हिसावर असणाऱ्या भारतीय स्थलांतरितांना सोपवली, असे द वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे.
20 कर्मचाऱ्यांनी आयोगाकडे TCS विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अहवालानुसार, तक्रार केलेल्या TCS कर्मचाऱ्यांमध्ये उत्तर अमेरिकन, आशियाई-अमेरिकन आणि हिस्पॅनिक अमेरिकन यांचा समावेश आहे. त्यांचे वय चाळीस ते साठ वर्षे आहे. तक्रारीनुसार, त्यांच्यापैकी बहुतेकांकडे एमबीए (मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन) किंवा उच्च पदव्या आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे त्यांनी आरोप केला आहे की कंपनी भारतीयांना अधिक प्राधान्य देत आहे. टीसीएसच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे प्रवक्त्याचे म्हणणे आहे.
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, कंपनीचा अमेरिकेत सर्वांना समान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि कंपनी आपला व्यवसाय पूर्ण प्रामाणिकपणे चालवत आहे.
टीसीएसने कंपनीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे प्रकरण आता Equal Employment Opportunity आयोगापर्यंत पोहोचले आहे. कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आयोगाला आहेत. मात्र, गोपनीयतेमुळे आयोगाच्या प्रवक्त्याने टीसीएसशी संबंधित प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.