Job Security: जगभरात कर्मचारी कपातीचे संकट; मात्र 'या' क्षेत्रांमधील नोकऱ्या आहेत सुरक्षित

Job Security Amidst Layoffs: जागतिक आर्थिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नोकर कपातीचा फटका बसला आहे. 2023 च्या अखेरीस सुरू झालेली कर्मचारी कपात अजूनही सुरूच आहे.
Amid tech layoffs, which industries are recession-proof in 2024
Amid tech layoffs, which industries are recession-proof in 2024 Sakal
Updated on

Job Security Amidst Layoffs: जागतिक आर्थिक मंदी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक नोकर कपातीचा फटका बसला आहे. 2023 च्या अखेरीस सुरू झालेली कर्मचारी कपात अजूनही सुरूच आहे.

याशिवाय नवीन नोकऱ्याही कमी झाल्या आहेत. हा ट्रेंड सध्या तरी थांबताना दिसत नाही. मात्र, अशा वातावरणातही काही क्षेत्रे अशी आहेत की ज्यांना आर्थिक मंदीचा फटका बसलेला दिसत नाही.

नोव्हेंबर 2023 पासून आयटी कंपन्यांमध्ये कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली. Alphabet Inc. ने 2024 च्या सुरुवातीला आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. याशिवाय Apple, Amazon, Meta, Dell, Ericsson, Cisco आणि SAP सारख्या मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना सतत बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. काही कंपन्यांनी कर्मचारी कपातीला खर्चातील कपातीचा मार्ग म्हटले तर काहींनी त्याला कर्मचारी व्यवस्थापन म्हटले.

Amid tech layoffs, which industries are recession-proof in 2024
Vistara Airlines: विस्तारा एअरलाइन्सच्या अडचणी वाढल्या; उड्डाण रद्द केल्याने सरकारने विचारले प्रश्न, काय आहे प्रकरण?

'या' क्षेत्रांमध्ये आहेत चांगल्या नोकरीच्या शक्यता

2024 मध्ये, सामाजिक सेवा, आरोग्य सेवा, हॉटेल आणि रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपातीचा धोका कमी आहे. या क्षेत्रांमध्ये नवीन नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाजारात फार्मा कंपन्यांची कामगिरी सुधारत आहे.

याशिवाय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मागणीही वाढत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सरकार काम करत आहे. त्यामुळे येथे नोकऱ्या मिळण्याची चांगली शक्यता आहे.

रिटेल आणि हॉटेल उद्योगही झपाट्याने वाढत आहे

आकडेवारीनुसार, भारतीय रिटेल क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तूंची मागणी 2027 पर्यंत 1.1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. हा आकडा झपाट्याने वाढेल आणि 2032 पर्यंत 2 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Amid tech layoffs, which industries are recession-proof in 2024
2000 Rupee Notes: दोन हजार रुपयांच्या ९७.६९ टक्के नोटा परत; ८,२०२ कोटी रुपयांच्या नोटा येणे बाकी

त्याचप्रमाणे, 2022 पर्यंत जीडीपीमध्ये हॉटेल उद्योगाचा वाटा 40 अब्ज डॉलर होता. असा अंदाज आहे की 2027 पर्यंत हा आकडा 68 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो. 2047 पर्यंत हॉटेल उद्योग 1 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठेल अशी अपेक्षा आहे. सध्या या क्षेत्रांतील नोकऱ्या जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.