SBI Scheme : एसबीआयची ही योजना पुन्हा सुरू; ७.६ टक्के मिळणार व्याज

SBI ने जारी केलेली ही योजना ४०० दिवसांच्या कालावधीची आहे. अमृत ​​कलश मुदत ठेव योजनेत, SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज निश्चित केले आहे.
SBI
SBIgoogle
Updated on

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेदारांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते. यासोबतच इतर नवीन वापरकर्ते जोडण्यासाठी बँकेकडून नवीन योजनाही सुरू केल्या जातात.

एसबीआयने पुन्हा आपल्या ग्राहकांसाठी जुनी योजना सुरू केली आहे. एसबीआयने १२ एप्रिलपासून पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी अमृत कलश मुदत ठेव योजना आणली आहे.

ही योजना १२ एप्रिलपासून सुरू होणार असून ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या अंतर्गत बँकेचे वापरकर्ते या योजनेत एफडी करू शकतात. (amrut kalash fixed deposit scheme in state bank of india SBI )

SBI
Retirement Plan : दरमहा ११ हजार पेन्शन हवी असेल तर या योजनेत लगेच गुंतवणूक करा

FD वर व्याज दर

SBI ने जारी केलेली ही योजना ४०० दिवसांच्या कालावधीची आहे. अमृत ​​कलश मुदत ठेव योजनेत, SBI ने ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज निश्चित केले आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक वगळता इतर नागरिकांसाठी ७.१० टक्के व्याज निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ फक्त ३० जूनपर्यंतच घेता येईल. यापूर्वी, बँकेने ही योजना १५ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत लागू केली होती.

SBI
Government Scheme : फक्त महिलांसाठी आहे ही योजना; एका वर्षात मिळणार १५ हजार रुपये

तुम्हाला व्याज कधी मिळेल

या योजनेअंतर्गत, मुदत ठेव केल्यानंतर पहिला महिना, तिसरा महिना आणि सहाव्या महिन्याच्या अंतराने SBI द्वारे व्याज दिले जाईल. या योजनेत मुदत ठेव करण्यासोबतच ग्राहकांना मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

यासोबतच बँक आपल्या ग्राहकांना या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याची सुविधाही देते. आयकर कायद्यानुसार मुदत ठेवीच्या व्याजातून टीडीएस कापला जाईल.

कोणाला फायदा होईल

ही योजना रु. २ कोटींपेक्षा कमी रकमेच्या घरगुती किरकोळ मुदत ठेवी आणि NRI रुपये मुदत ठेवींसाठी लागू आहे. यामध्ये नवीन ठेवी करता येतील. यासोबतच जुन्या ठेवींचे नूतनीकरणही करता येणार आहे. यामध्ये खातेदारांना मुदत ठेव आणि विशेष मुदत ठेवीची सुविधाही उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()