Amul Milk: अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ, आता लिटरमागे दोन रुपये महागणार, आजपासून लागू होणार नवे दर

अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
Amul Milk
Amul Milksakal
Updated on

Amul Milk Price Hike: आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने गुजरातच्या जनतेला मोठा धक्का दिला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

अमूल ताझा, शक्ती, टी स्पेशल, गायीचे दूध, स्लिम अँड स्ट्रीम, गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रँडच्या किंमतीत आता 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. अमूलने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.

वृत्तानुसार, नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. आता नवीन किंमतींनुसार, अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने विकले जाईल. यासोबतच म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर चार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जी आता 34 रुपये प्रति 500 ​​मिली दराने विकली जाईल.

Amul Milk
LPG Price : आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी बातमी, LPG गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किंमतीत मोठी घट

अमूलने दुधाचे दर का वाढवले?

उत्पादन आणि खर्चात वाढ झाल्याने अमूल दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती कंपनीने एका निवेदनाद्वारे दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चाऱ्याच्या दरात 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

त्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने सांगितले की, इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या मजुरीत किंमतीत 8-9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

दर महिन्याला वाढत आहेत दुधाचे भाव :

गेल्या वेळी अमूल कंपनीने ऑक्टोबर 2022 मध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती आणि आज 3 फेब्रुवारीला दुधाच्या दरात वाढ जाहीर केली आहे. अशा स्थितीत ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत दुधाच्या दरात दर महिन्याला सरासरी 1 रुपयांनी वाढ झाली आहे.

Amul Milk
महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.