Amul Strongest Food Brand: अमूल दूध पीता है इंडिया… ही जाहिरात तुम्ही अनेकदा पाहिली आणि ऐकली असेल. मात्र आता अमूलचा देशातच नव्हे तर जगभरात दबदबा निर्माण झाला आहे. अमूल आता जगातील सर्वात मजबूत फूड ब्रँड बनला आहे. ब्रँड फायनान्सच्या अहवालात याला AAA+ रेटिंग मिळाले आहे.