Amway India: अ‍ॅमवे इंडियाविरोधात ईडीची मोठी कारवाई; काय आहे 4,050 कोटी रुपयांचे प्रकरण?

ED Action Against Amway India: कंपनीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
ED Action Against Amway India
ED Action Against Amway IndiaEsakal
Updated on

ED Action Against Amway India:

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अ‍ॅमवे इंडिया या डायरेक्ट सेलिंग फर्मवर मोठी कारवाई केली आहे. कंपनीविरुद्ध हैदराबादच्या विशेष न्यायालयात 4,050 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तेलंगणा पोलिसांकडे यापूर्वीही कंपनीविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ईडी आणि कंपनीच्या संचालकांविरोधात नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडी चौकशी करत आहे.

काय आहे आरोप?

अंमलबजावणी संचालनालयाने अ‍ॅमवे इंडियावर आरोप केला आहे की कंपनीकडून 'मनी सर्कुलेशन स्कीम'चा प्रचार बेकायदेशीरपणे केला जात आहे. ही योजना पिरॅमिड योजना असल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यामध्ये वरच्या श्रेणीत असलेल्या लोकांना मोठा फायदा होतो.

Amway India लोकांची फसवणूक करत आहे

कंपनी माल विक्रीच्या नावाखाली नावनोंदणी करून जास्त कमिशनचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या योजनेत जितके नवीन सदस्य सामील होतील तितके वरच्या लोकांना अधिक कमिशन मिळेल.

ED Action Against Amway India
Employment: नवीन नोकऱ्यांची वाढ सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; धक्कादायक आकडेवारी आली समोर

कमिशनची कमाई 4050.21 कोटी रुपये

केवळ 'मनी सर्क्युलेशन स्कीम'द्वारे अॅमवेने 4050.21 कोटी रुपये कमावल्याचेही तपासात समोर आले आहे. एवढेच नाही तर परदेशात बसलेल्या गुंतवणूकदारांना कंपनीने 2,859 कोटी रुपये पाठवले.

त्यानंतरच ही कंपनी अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. 757.77 कोटी रुपयांची किंमत असलेल्या कंपनीच्या मालमत्तेचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.

कंपनीने दिले स्पष्टीकरण

अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केलेल्या कारवाईनंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले की हे प्रकरण 2011 च्या तक्रारीशी संबंधित आहे. कंपनी या प्रकरणाच्या तपासात ईडीला पूर्ण सहकार्य करत आहे आणि तपास यंत्रणेने मागवलेले तपशीलही देत ​​आहे.

कंपनीने 25 वर्षांपूर्वी भारतात आपले काम सुरू केले. देशातील सर्व कायद्यांना बांधील असल्याचे सांगितले. कंपनीचे देशभरात 2,500 हून अधिक कर्मचारी आणि 5.5 लाखांहून अधिक वितरक आहेत.

ED Action Against Amway India
सुरत डायमंड बोर्सच्या 135 कार्यालयांचं आज उद्घाटन; 26 हिरे व्यापाऱ्यांचा मुंबईला जय महाराष्ट्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()