Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दर महिना 1,000 रुपयांची गुंतवणूक करा; तयार करा 8 लाखाचा फंड, कसा ते जाणून घ्या?

Post Office Scheme : सरकारी योजनांमधल्या गुंतवणुकीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे (Public Provident Fund- PPF) नाव सगळ्यात आधी समोर येते.
Post Office Scheme
Post Office Schemeesakal
Updated on

Post Office Scheme : सरकारी योजनांमधल्या गुंतवणुकीत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे (Public Provident Fund- PPF) नाव सगळ्यात आधी समोर येते. ही पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख गुंतवू शकता. पीपीएफ योजना 15 वर्षांत मॅच्युअर अर्थात परिपक्व होते. याशिवाय यामध्ये कर सवलतही (Tax Benefit) मिळते.

लाँग टर्म गुंतवणुकीद्वारे तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी भरपूर पैसे जमा करायचे असतील, तर ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकते. सध्या या योजनेवर 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या मुलाच्या नावावर दरमहा 1000 रुपये जमा करत राहिल्यास, तुम्ही त्यात 8 लाखांहून अधिक रक्कम जोडू शकता.

Post Office Scheme
Post Office Scheme : गुंतवणूकीइतकीच व्याजाची रक्कम, पोस्ट ऑफीसची ही स्कीम देईल दुप्पट कमाई...

तुम्ही या योजनेत दरमहा 1,000 रुपये गुंतवल्यास एका वर्षात 12,000 गुंतवणूक होईल. ही योजना 15 वर्षांनी मॅच्युअर होईल, पण तुम्हाला ती प्रत्येकी 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा वाढवावी लागेल आणि 25 वर्ष सतत गुंतवणूक चालू ठेवावी लागेल.

जर तुम्ही 25 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1,000 रुपये गुंतवले तर तुम्ही एकूण 3,00,000 रुपये गुंतवाल. पण 7.1 टक्के व्याजानुसार, तुम्ही 5 लाख 24 हजार 641 रुपये फक्त व्याजातून मिळवाल आणि तुमची मॅच्युरिटी रक्कम 8 लाख 24 हजार 641 रुपये होईल.

पीपीएफ अकाउंट एक्‍सटेंशन 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये केले जाते. पीपीएफ विस्ताराच्या बाबतीत, गुंतवणूकदाराकडे दोन प्रकारचे पर्याय आहेत. पहिला म्हणजे योगदानासह खाते विस्तार (Contribution with account extension) आणि दुसरा, गुंतवणूकीशिवाय खाते विस्तार (Contibution without account extension).

जर तुम्हाला योगदानासह खाते विस्तार करायचे असल्यास तुमचे खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज सादर द्यावा लागेल. हा अर्ज मॅच्युरिटीच्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी द्यावा लागेल आणि मुदतवाढीसाठी एक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म त्याच पोस्ट ऑफिस/बँक शाखेत सबमिट केला जाईल जिथे PPF खाते उघडले गेले आहे.

पीपीएफ ही EEE कॅटेगरीची स्कीम आहे, त्यामुळे तुम्हाला या योजनेत 3 प्रकारची कर सूट अर्थात टॅक्स बेनेफिट मिळेल. EEE म्हणजे Exempt Exempt Exempt. या वर्गवारीत येणाऱ्या योजनांमध्ये, दरवर्षी जमा केलेल्या रकमेवर कोणताही कर नाही, याशिवाय, दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही आणि मुदतपूर्तीच्या वेळी मिळालेली संपूर्ण रक्कम देखील करमुक्त आहे. म्हणजे गुंतवणूक, व्याज/परतावा आणि मॅच्युरिटीवर तिन्हीवर कर वाचतो.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Post Office Scheme
Post Office : खबर देणारी पोस्टाची पेटीच बेखबर; सेवा क्षेत्रात भरीव योगदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.