Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी पोस्ट शेअर करत सांगितली 'बिजली'ची गोष्ट, त्यानंतर देशात...

Mahindra Group First EV: आनंद महिंद्रा म्हणाले की, 'बिजली' काळाच्या खूप पुढे होती.
Anand Mahindra shares heartwarming story behind Mahindra's first EV, BIJLEE
Anand Mahindra shares heartwarming story behind Mahindra's first EV, BIJLEE Sakal
Updated on

Mahindra Group First EV: प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे अनेकदा X (पूर्वीचे Twitter) वर चर्चेत असतात. जागतिक ईव्ही दिनानिमित्त त्यांनी x वर पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी महिंद्रा ग्रुपने बनवलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर बिजली (BIJLEE) चा प्रवास शेअर केला आहे.

आनंद महिंद्रांनी सांगितले की, BIJLEE ही कंपनीचे अनुभवी अधिकारी नगरकर यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी तयार केली होती, परंतु ही इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकली नाही. काही युनिट्सनंतर उत्पादन बंद करण्यात आले.

आनंद महिंद्रा काय म्हणाले?

आनंद महिंद्रांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे अधिकारी नगरकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वी त्याचे डिझाइन बनवले होते, परंतु BIJLEE भारतीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करू शकली नाही.

X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत म्हणाले की ''आज जागतिक EV दिवस आहे आणि तो मला भूतकाळात घेऊन गेला आहे. ते म्हणाले की 1999 मध्ये @MahindraRise च्या नगरकर यांनी आमची पहिली EV- 3 चाकी बिजली (BIJLEE) तयार केली. निवृत्तीपूर्वी ही त्यांची खास भेट होती... त्यांचे शब्द मी कधीही विसरणार नाही.''

Anand Mahindra shares heartwarming story behind Mahindra's first EV, BIJLEE
G20 Summit 2023: ऋषी सुनक आहेत इतक्या कोटींचे मालक, राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे?
Anand Mahindra shares heartwarming story behind Mahindra's first EV, BIJLEE
Demat Account: गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे, ऑगस्ट महिन्यात इतक्या नव्या डी-मॅट खात्यांची झाली नोंद

महिंद्राच्या पहिल्या ईव्हीला बाजारात स्थान का मिळाले नाही?

आनंद महिंद्रा म्हणाले की, बिजली ईव्ही त्याच्या काळाच्या खूप पुढे होती. त्यामुळे ती बाजारात जास्त काळ टिकू शकली नाही. ते म्हणाले की, याच कारणामुळे आम्ही काही वर्षांच्या निर्मितीनंतर तीला निरोप दिला. आनंद महिंद्रा म्हणाले की, हा प्रवास आम्हाला सतत प्रेरणा देणारा आहे आणि आम्ही तिचा आणखी विस्तार करण्यावर भर देत राहू.

आनंद महिंद्रांनी पोस्ट शेअर केल्यानंतर लोकांनी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांनी बिजलीला (BIJLEE) परत आणण्याचे आवाहनही केले. काहींनी टेस्ला आणि बीवायडी या परदेशी कंपन्यांच्या विरोधात नवीन उत्पादने तयार करण्याचा सल्ला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.