Anant Ambani News : अनंत-आकाश अन् इशा... कोणाकडे रिलायन्सचे किती शेअर? जाणून घ्या वाटणी

Anant Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेशनची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे.
Anant Ambani News
Anant Ambani News
Updated on

Anant Ambani Latest News : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि त्यांची होणारी पत्नी राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेशनची भारतासह जगभरात चर्चा सुरू आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जगातील सर्व बड्या सेलिब्रेटीज सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमादरम्यान अनंत अंबानी यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या स्पीच व्हिडिओमध्ये मुलगा अनंतचे बोलणे ऐकून मुकेश अंबानी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

वडील म्हणून मुकेश अंबानी यांचे आकाश, ईशा आणि अनंत अंबानी या मुलांवरील प्रेम नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असते. गेल्या वर्षी मुकेश अंबानी यांनी आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समावेश करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिला तर तिन्ही भावंडांचे शेअर्स समान आहेत.

कोणाकडे किती शेअर्स आहेत?

डिसेंबर २०२३ पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर्सकडे कंपनीत ५०.३० टक्के हिस्सा आहे. तर, पब्लिक शेअरहोल्डिंग ४९.७० टक्के आहे. अंबानी यांच्यासह त्यांची आई कोकिलाबेन अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि मुले - ईशा, आकाश आणि अनंत अंबानी या कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. मुकेश अंबानी यांची तीन मुले म्हणजे ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे समान ८०,५२,०२१ शेअर्स आहेत.

Anant Ambani News
Pakistan New Prime Minister: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शेहबाज शरीफ, 'इतक्या' मतांनी जिंकली निवडणूक

म्हणजेच तिन्ही भावंडांकडे अनुक्रमे ०.१२ टक्के हिस्सेदारी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुकेश अंबानी किंवा त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांच्याकडेही तेवढाच हिस्सा आहे. मात्र, आई कोकिलाबेन अंबानी यांच्याकडे कंपनीत १,५७,४१,३२२ शेअर्स म्हणजेच ०.२४ टक्के हिस्सा आहे.

गेल्या वर्षी शेअरहोल्डर्सनी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांचा रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळात समावेश करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर ३२ वर्षीय ईशा आणि आकाश यांना रिलायन्सच्या संचालक मंडळावर नियुक्त होण्यासाठी ९८ टक्क्यांहून अधिक मते मिळाली, तर २८ वर्षीय अनंत यांना ९२.७५ टक्के मते मिळाली होती.

Anant Ambani News
Rahul Gandhi on Ambani Family : ''इकडे लोक उपाशी मरत आहेत अन् तिकडे...'', अंबानींच्या 'प्री-वेडिंग'वरुन राहुल गांधींचा निशाणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.