Apple Credit Card: Apple देणार PhonePay आणि GooglePay ला टक्कर? लवकरच क्रेडिट कार्ड भारतात होणार लाँच

आयफोन कंपनी अॅपल भारताच्या पेमेंट क्षेत्रात प्रवेश करणार आहे.
Apple CEO Tim Cook
Apple CEO Tim CookSakal
Updated on

Apple Credit Card: आयफोन कंपनी अॅपल भारताच्या पेमेंट क्षेत्रात प्रवेश करणार आहे. लवकरच कंपनी क्रेडिट कार्ड लॉन्च करू शकते. असे सांगितले जात आहे की त्याचे नाव Apple Card असू शकते.

मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार Apple चे सीईओ टिम कुक यांनी एप्रिलमध्ये भारताच्या भेटीदरम्यान एचडीएफसी बँकेचे सीएमडी शशिधर जगदीशन यांच्याशी चर्चा केली होती.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) सोबत देशात Apple Pay लाँच करण्यासाठी चर्चा चालू आहे. रुपे क्रेडिट कार्ड लाँच करण्याचा फायदा असा आहे की ते UPI शी देखील जोडले जाऊ शकते. त्यामुळे लवकरच PhonePay आणि GooglePay ला टक्कर मिळू शकते.

अॅपलने कार्डबाबत रिझर्व्ह बँकेशीही चर्चा केली आहे. यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि कोणतीही विशेष सुविधा मिळणार नाही, असे आरबीआयने कंपनीला सांगितले आहे. अॅपल आणि एचडीएफसीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Apple CEO Tim Cook
Home Loan: फ्लॅट-घर खरेदी करण्यासाठी किती पगार असावा? हा फॉर्म्युला बघा नायतर EMI भरण्यातच जाईल आयुष्य!

नुकतेच Apple ने Stores लाँच केले

Apple ने काही महिन्यांपूर्वीच भारतात आपले स्टोअर लाँच केले आहे. रिपोर्ट्सनुसार, सीईओ टिम कुक यांनी Apple Stores लाँच करताना HDFC बँकेचे CEO आणि MD शशिधर जगदीशन यांची भेट घेतली होती.

या देशांमध्ये अॅपल कार्ड

आत्तापर्यंत, Apple यूएसए मध्ये त्यांचे प्रीमियम क्रेडिट कार्ड चालवते. गोल्डमन सॅक्स आणि मास्टरकार्ड यांच्या संयुक्त सहकार्याने हे कार्ड लाँच करण्यात आले. हे टायटॅनियम धातूपासून बनलेले आहे.

ऍपल कार्डची वैशिष्ट्ये:

Apple कार्ड वापरणारे ग्राहक 1% पर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. Apple Stores आणि निवडक भागीदारांवर पेमेंट करण्यासाठी कार्ड वापरणाऱ्यांसाठी, कॅशबॅक 3% पर्यंत असेल.

Apple त्यांच्या Apple कार्डधारकांकडून कोणतेही लेट फी आकारत नाही. कंपनी परदेशी व्यवहार आणि परत केलेल्या पेमेंटवर कोणतेही शुल्क आकारत नाही.

तसेच वार्षिक क्रेडिट कार्ड शुल्क नाही. ऍपल कार्ड धारक त्यांचे दैनंदिन रोख जमा करण्यासाठी 4.15% बचत खाते उघडू शकतात.

Apple CEO Tim Cook
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.