Armee Infotech IPO : आर्मी इन्फोटेक आणणार 250 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

आयपीओच्या माध्यमातून 250 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओअंतर्गत फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.
Armee Infotech IPO
Armee Infotech IPOSakal
Updated on

अहमदाबादस्थित आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स कंपनी आर्मी इन्फोटेक (Armee Infotech) लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. कंपनीने यासाठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे.

आयपीओच्या माध्यमातून 250 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. या आयपीओअंतर्गत फक्त नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याचा अर्थ ऑफर फॉर सेलद्वारे (OFS) कोणतीही विक्री होणार नाही.

ड्राफ्ट पेपर्सनुसार, आयपीओतून मिळणाऱ्या उत्पन्नातील 160 कोटी (IPO खर्च वगळून) खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरला जाईल. याशिवाय 10.63 कोटी कर्जाच्या परतफेडीसाठी वापरण्यात येणार आहेत.

उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. या वर्षाच्या एप्रिल अखेरीस आर्मी इन्फोटेकची थकबाकी कर्जे 79.8 कोटी होती. गुजरातस्थित कंपनीत पटेल कुटुंबाचे 92.72 टक्के शेअरहोल्डिंग आहे आणि बाकीचे पब्लिक शेअरहोल्डर्सचे आहेत. खंडवाला सिक्युरिटीज आणि सॅफ्रॉन कॅपिटल ॲडव्हायझर्स हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

आर्मी इन्फोटेक आयटी मॅनेज्ड सर्व्हिसेस प्रदान करते. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 560.2 कोटींच्या रेव्हेन्यूवर 24.96 कोटी नफा होता तो मागील वर्षीच्या 3.4 कोटीच्या तुलनेत 393 टक्क्यांनी वाढून 16.6 कोटी झाला.

याच कालावधीत महसूल 301.6 टक्क्यांनी वाढून 502.7 कोटी झाला. पण मार्च FY22 मध्ये संपलेल्या वर्षात 3.4 कोटीची बॉटमलाइन FY21 मधील 3.7 कोटीच्या तुलनेत 9.7 टक्क्यांनी कमी झाली आहे. या कालावधीत महसूल 19.2 टक्क्यांनी वाढून 125.2 कोटी झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.