Mutual Fund KYC : ‘केवायसी’बाबत नक्की काय करावे?

सध्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना ‘केवायसी’ अर्थात ‘नो युवर कस्टमर’ म्हणजे ओळख पटविण्यासाठी अधिकृत कागदपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ई-मेल अथवा मेसेज येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
Mutual Fund KYC
Mutual Fund KYCsakal
Updated on

सध्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांना ‘केवायसी’ अर्थात ‘नो युवर कस्टमर’ म्हणजे ओळख पटविण्यासाठी अधिकृत कागदपत्रे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ई-मेल अथवा मेसेज येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. गुंतवणूक करताना, ‘केवायसी’साठी आवश्‍यक कागदपत्रे दिलेली होती, मग आता परत का द्यायची? त्यातूनही ही प्रक्रिया करायची असेल तर ती कशी आणि कोठे जाऊन करायची, असे अनेक प्रश्‍न त्यांना भेडसावत आहेत. त्याची उत्तरे या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्या लोकांनी पूर्वी ‘केवायसी’ केली होती, त्या लोकांना ‘केवायसी’ एजन्सीकडून त्यांच्या गुंतवणुकीची स्टेटमेंट ई-मेल अथवा मेसेजद्वारे पाठवली जातात; पण ते ई-मेल किंवा मेसेज गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत नाहीत, हे भांडवल बाजार नियामक ‘सेबी’च्या लक्षात आले आहे. अनेकदा पूर्वी ‘केवायसी’ करताना दिलेला ई-मेल आयडी आणि फोन नंबर बदलला जातो. मात्र, त्याची माहिती फंड कंपनीला दिली जात नाही, त्यामुळे कंपनीने पाठविलेले मेसेज किंवा ई-मेल ग्राहकांना मिळत नाहीत. हे लक्षात घेऊन ‘केवायसी’ बाबत काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Mutual Fund KYC
Share Market Closing: शेअर बाजारातील 5 दिवसांच्या तेजीला ब्रेक; सेन्सेक्स 74,000च्या खाली, कोणते शेअर्स घसरले?

नवे नियम

तुमच्या ‘केवायसी’चा स्टेटस ‘ऑन- होल्ड’ असे असेल, तर तुम्हाला कोणतेही नवे व्यवहार करता येणार नाहीत. तुम्हाला लगेच पुन्हा नव्याने ‘केवायसी’ करावी लागेल. तुमच्या ‘केवायसी’चा स्टेटस ‘रजिस्टर्ड’ असा असेल, तर तुमच्या सध्या सुरू असलेल्या ‘एसआयपी’ पुढेही चालू राहतील. तुमची गुंतवणूक जिथे आहे, तिथे सर्व व्यवहार करता येतील.

मात्र, दुसऱ्या कंपनीचे नवे फंड घेता येणार नाहीत. त्यासाठी नवी ‘केवायसी’ करणे अनिवार्य आहे. तुमच्या ‘केवायसी’चा स्टेटस ‘व्हॅलिडेटेड’ असा असेल, तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुमचे नाव, जन्मतारीख, पॅन कार्डवर वेगळी आणि ‘केवायसी’ला वेगळी असेल, तरी तुम्हाला पॅन कार्डप्रमाणेच नव्याने ‘केवायसी’ करायला हवी. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक या तिन्ही ठिकाणी नाव सारखे असायला हवे.

‘केवायसी’ स्टेटस तपासणे

‘केवायसी’ तपासण्यासाठी https://www.camskra.com/ या लिंकवर जाऊन, तुमचा ‘पॅन’ तिथे टाकल्यानंतर, तुमचे ‘केवायसी’ स्टेटस लगेच दिसेल. ‘केवायसी’ करण्यासाठी सीव्हीएल, कार्व्ही, एनडीएमएल, डोटेक्स आणि कॅम्स या चार संस्था कार्यरत आहेत. दिलेल्या लिंकवर जाऊन ३० एप्रिलच्या आत तुमचे ‘केवायसी’ स्टेटस तपासा आणि ते अपडेट नसेल, तर लवकरात लवकर करून घ्या. अन्यथा, तुमच्या गुंतवणुकीत अडचणी येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.