Oil Companies reduce ATF Price : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करत आहेत. मात्र, यापूर्वीच सरकारी इंधन कंपन्यांनी एअरलाईन्स कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. एव्हिएशन टर्बाईन फ्युअल (ATF) किंमतीमध्ये सलग चौथ्यांदा कपात करण्यात आली आहे. इंडियन ऑईल कॉर्परेशनने याबाबत माहिती दिली आहे.
एटीएफच्या किंमतीमध्ये 1,221 रुपये प्रति किलोलीटर एवढी मोठी कपात करण्यात आली आहे. आजपासूनच (1 फेब्रुवारी) हे दर लागू होणार आहेत.
दिल्लीमध्ये डोमेस्टिक एअरलाईन्ससाठी एटीएफमध्ये 1,221 रुपये प्रति किलोलीटर कपात केली आहे. यामुळे आता दिल्लीमध्ये एटीएफची किंमत 1,00,772.17 रुपये प्रति किलोलीटर एवढी झाली आहे. मुंबईमध्ये एटीएफचे नवे दर हे 94,246 रुपये प्रति किलोलीटर झाले आहेत. कोलकाता आणि चेन्नईमध्ये हे दर अनुक्रमे 1,09,797.33 आणि 1,04,840.19 रुपये प्रति किलोलीटर एवढे आहेत.
एखाद्या विमान कंपनीच्या ऑपरेशनल कॉस्टमध्ये जवळपास 50 टक्के भाग हा एटीएफचा असतो. त्यामुळेच इंधनाच्या किंमतीत कपात झाल्यामुळे कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सरकारने 1 जानेवारी रोजी जेट फ्यूअलच्या दरात कपात केली होती.
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने चौथ्यांदा हवाई इंधनाच्या दरात कपात केली आहे. यामुळे आता विमान कंपन्या तिकिटांच्या दरात कपात करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. अर्थात, कंपन्या हा अतिरिक्त फायदा स्वतःसाठी किती ठेवतील आणि ग्राहकांना कितपत देतील याबाबत साशंकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.