Ayodhya Property: राम मंदिरामुळे अयोध्येत गुंतवणूकदारांच्या उड्या; जमिनीचे भाव भिडले गगनाला

Ayodhya Property Price Rise : अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याचा दिवस जवळ येत असून 22 जानेवारी 2024 रोजी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होणार आहे. त्याची तयारी केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशात जोरात सुरू आहे. अयोध्या हे आता गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनत आहे.
Ayodhya Property Price Rise
Ayodhya Property Price RiseSakal
Updated on

Ayodhya Property Price Rise: अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचा दिवस जवळ येत असून 22 जानेवारी 2024 रोजी हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होणार आहे. त्याची तयारी केवळ अयोध्येतच नाही तर संपूर्ण देशात जोरात सुरू आहे. अयोध्या हे आता केवळ श्रद्धेचे केंद्रच नाही तर गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंतीचे शहर बनत आहे.

अयोध्या हे कायमच श्रद्धेचे केंद्र राहिले आहे आणि आता येथे राम मंदिर होणार असल्याने येथील चित्र बदलणार आहे. एकीकडे मोठमोठ्या हॉटेल चेन येथे आपली हॉटेल्स उभारण्याच्या तयारीत आहेत, तर दुसरीकडे वाहतूक सुविधा वाढवण्यासाठी विमानतळही सज्ज झाले आहेत. या सगळ्यात आता अयोध्येत व्यवसाय उभारण्याची घोडदौड सुरू झाली आहे.

तीन ते चार पट भाव वाढले

राम मंदिराचा सकारात्मक परिणाम केवळ अयोध्येपुरता मर्यादित नसून अयोध्येच्या बाहेरील भागात जमिनीच्या किंमती वाढल्या आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. ही वाढ लवकर थांबणार नसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.

अयोध्या शहरातील जमिनीचा दर जो रुपये 1,000-2,000 प्रति चौरस फूट होता तो आता रुपये 4,000-6,000 प्रति चौरस फूट इतका वाढला आहे. फैजाबाद रोड परिसरातील जमिनीचा दर जो रुपये 400-700 प्रति चौरस फूट होता तो आता जवळपास रुपये1,500-3,000 प्रति चौरस फूट झाला आहे.

Ayodhya Property Price Rise
SBI Report: एसबीआयचा दावा! देशात आर्थिक विषमता झाली कमी, करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ

मोठ्या ब्रँड्सची दुकाने

अयोध्येत डोमिनोज, पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या मोठ्या ब्रँड्सची आऊटलेट्स सुरू झाली आहेत. त्याचबरोबर ब्रँडेड हॉटेल्स आणि रिअल इस्टेट कंपन्यांची मोठी साखळी अयोध्येत गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. धार्मिक महत्त्वासाठी ओळखली जाणारी अयोध्या आता गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत आहे.

Ayodhya Property Price Rise
ZEE vs SEBI Order: ZEEL प्रकरणात पुनित गोएंका यांना मोठा दिलासा, SAT ने SEBI च्या आदेशाला दिली स्थगिती

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या पवित्र शहरात येतात, परंतु राम मंदिराचे बांधकाम आणि त्याच्या उद्घाटन सोहळ्यामुळे स्थानिक पर्यटन उद्योगाला चालना मिळाली आहे. या सर्व सोहळ्यामुळे गेल्या वर्षभरात येथील मालमत्तांचे दर 100 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.