Bajaj Auto: देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी पुन्हा एकदा वाहनांवरील कराचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजीव बजाज यांनी बाइक आणि स्कूटरवरील 28 टक्के GST कराच्या विरोधात यापूर्वीही वक्तव्य केलं होतं.
ते म्हणाले की, एकीकडे सरकार इलेक्ट्रिक व्हेईकलवर (EV) 5 टक्के कर आकारत आहे. मात्र, सीएनजी बाइकवर 28 टक्के कर आकारला जात आहे. बजाज ऑटोने अलीकडेच जगातील पहिली CNG बाईक Freedom 125 लॉन्च केली.