‘बजाज हाउसिंग’चा आयपीओ

बजाज फायनान्सची शंभर टक्के उपकंपनी असणाऱ्या बजाज हाउसिंग फायनान्स या गृहकर्जवाटप करणाऱ्या कंपनीचा आयपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान प्राथमिक शेअर बाजारात विक्रीसाठी येत आहे.
IPO
IPOsakal
Updated on

बजाज फायनान्सची शंभर टक्के उपकंपनी असणाऱ्या बजाज हाउसिंग फायनान्स या गृहकर्जवाटप करणाऱ्या कंपनीचा आयपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबरदरम्यान प्राथमिक शेअर बाजारात विक्रीसाठी येत आहे. या शेअरची नोंदणी १६ सप्टेंबर रोजी होईल.

आयपीओसाठी प्रतिशेअर ६६ ते ७० रुपये किंमतपट्टा असून, छोट्या गुंतवणूकदारांना कमीत कमी २१४ (१४,९८० रुपये) शेअरसाठी, तर कमाल २७८२ शेअर (१,९४,७४० रुपये) अर्ज करता येणार आहे. ज्या गुंतवणूकदारांकडे ३० ऑगस्टअखेर बजाज फायनान्स अथवा बजाज फिनसर्व्हचे शेअर असतील, त्यांना वैयक्तिक आणि गुंतवणूकदार अशा दोन्ही विभागांतून अर्ज करता येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.