Bajaj Group: बजाज बनला देशातील तिसरा सर्वात मोठा आर्थिक समूह; SBIला टाकले मागे, पहिल्या क्रमांकावर कोण?

Bajaj Most Valued Finance Group: बजाज समूह हा देशातील तिसरा सर्वात मोठा मूल्यवान समूह बनला आहे. SBI समुहाला बजाजने मागे टाकले आहे. बजाज समूहाच्या चार लिस्ट वित्तीय कंपन्या आहेत. ज्यांचे मार्केट कॅप 10.36 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
Bajaj Most Valued Finance Group
Bajaj Most Valued Finance GroupSakal
Updated on

Bajaj Most Valued Finance Group: बजाज समूह हा देशातील तिसरा सर्वात मोठा मूल्यवान समूह बनला आहे. बजाजने SBI समूहाला मागे टाकले आहे. बजाज समूहाच्या चार लिस्ट वित्तीय कंपन्या बजाज होल्डिंग्ज, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स आणि आता लिस्ट झालेली बजाज हाउसिंग फायनान्सचे मार्केट कॅप 10.36 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेसचे एकत्रित मार्केट कॅप 9.6 लाख कोटी रुपयांवर आले आहे. मात्र, मालमत्तेच्या बाबतीत बजाज समूह इतर आर्थिक समूहांपेक्षा खूपच मागे आहे.

15.75 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह HDFC समूह हा देशातील सर्वात मोठा आर्थिक समूह आहे. ICIC समूह 11.95 लाख कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ICICI समुहाकडे चार लिस्टेड कंपन्या आहेत.

Bajaj Most Valued Finance Group
EY Employee Death: 'कामाच्या ताणामुळे' CAचा मृत्यू... निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

यामध्ये ICICI बँक, ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स आणि ICICI सिक्युरिटीज यांचा समावेश आहे. या यादीत 3.85 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह ॲक्सिस बँक पाचव्या स्थानावर आहे आणि कोटक महिंद्रा बँक 3.79 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह सहाव्या स्थानावर आहे.

पहिल्या क्रमांकावर कोण आहे?

मालमत्तेच्या बाबतीत, एसबीआय 64.29 लाख कोटी रुपयांसह अव्वल आहे. ICICI बँक 41.56 लाख कोटींसह दुसऱ्या, एचडीएफसी समूह (38.55 लाख कोटी) तिसऱ्या, ॲक्सिस बँक (14.53 लाख कोटी) चौथ्या, कोटक महिंद्रा बँक (7.24 लाख कोटी) पाचव्या आणि बजाज समूह (3.93 लाख कोटी) सहाव्या स्थानावर आहे.

Bajaj Most Valued Finance Group
IPO Alert: हॉटेल क्षेत्रातील सर्वात मोठा IPO येणार; टाटांना देणार टक्कर, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

निव्वळ नफ्याच्या बाबतीतही एसबीआय 67,103 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर HDFC बँक ( 63,899 कोटी), ICICI समूह ( 44,246 कोटी) तिसऱ्या, ॲक्सिस बँक ( 26,386 कोटी) चौथ्या क्रमांकावर, कोटक महिंद्रा बँक ( 18,213 कोटी) पाचव्या आणि बजाज समूह ( 15,415 कोटी) सहाव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.