online fraud
online fraudSakal

एका ‘क्लिक’मुळे होतय बँक अकाऊंट खाली, ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करावे?

Published on

पिंपरी: ‘ऑनलाइन ट्रेडिंगद्वारे नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सूसमधील तरुणाची अकरा लाखांची फसवणूक झाली.’ ‘तरुणाच्या ट्विटर अकाऊंटवर बॅंकेचे केवायसी व्हिरेफिकेशन करण्यासाठी ॲप डाउनलोड करायचे सांगून तरुणाच्या डेबिट कार्डचा वापर करून साडेतास लाखांची फसवणूक केली.’

वाढत्या डिजीटलायजेशनमुळे अशा प्रकारे ऑनलाइन अर्थात सायबर गुन्हे घडत आहेत. केवळ एका ‘क्लिक’मुळे बॅंक अकाऊंट खाली होत आहेत. ते टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

भाजीपाला खरेदी करणे असो की ‘सिंगल’ चहा घेणे, अशा छोट्या व्यवहारापासून मोठ्या व्यवहारापर्यंत ‘ऑनलाइन’चे प्रमाण वाढले आहे. ‘कॅशलेस’ व्यवहाराचे फायदे असले तरी फसवणुकीचे प्रमाणही वाढले आहेत. दररोज कोणीतरी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरत आहे. मात्र, अशा प्रकार घडल्यानंतर काय करायला हवे? याची माहितीही करून घेणे आवश्यक ठरत आहे.

ऑनलाइन फसवणूक झाल्यास...

- सर्वप्रथम https://cybercrime.gov.in. लिंकवर जावे
- त्यातील होम पेजवर ‘तक्रार नोंदवा’ ऑप्शनमध्ये तक्रार नोंदवा
- त्यानंतर ‘टर्म ॲण्ड कंडिशन’वर ‘क्लिक’ करून पुढील ‘पेज’ मिळेल
- ‘सायबर क्राईम रिपोर्ट’ बटणावर ‘क्लिक’ करा
- ‘सायबर क्राईम रिपोर्ट’मध्ये नाव, ईमेल व फोन नंबर टाकून लॉगिन करा.
- यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो टाका
- ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर ‘सबमिट’ म्हणा
- त्यानंतर आलेल्या ‘पेज’वर फसवणुकीची तक्रार नोंदवून ‘सबमिट’ म्हणा
- त्यानंतरच्या ‘पेज’वर गुन्ह्याचा तपशील भरा, ‘सेव्ह’ करा, ‘नेक्स्ट’ म्हणा
- त्यानंतरच्या ‘पेज’वर संभाव्य संशयिताची माहिती भरून ‘सबमिट’ म्हणा
- त्यायानंतर तक्रार नोंदवल्याचा मेसेज येईल

फसवणूक कोणासोबत व का होऊ शकते


- ऑनलाइन फसवणूक कोणासोबतही होऊ शकते
- मोबाईलद्वारे ऑनलाइन व्यवहार करणारे
- ऑनलाइन व्यवहारामुळे आपली माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचू शकते
- ऑनलाइनमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर आयडेंटिटी व डॉक्युमेंट्स बाबत फसवणूक होऊ शकते
- मोबाईल फोन किंवा ई-मेल आलेल्या व ‘आमिष’ दाखवणाऱ्या मेसेजला प्रतिसाद दिल्यास
- ऑनलाइन फसवणूक झाल्यास मानसिक त्रास अधिक होतो
- तक्रार कुठे व कशी करावी, हे अनेकांना माहिती नसते
- ऑनलाइन फसवणुकीचा तपास करणेही गुंतागुंतीचे असते

फसवणुकीसाठी नवनवे फंडे


- वाहन भाड्याने द्यायचे आहे?, तुमची वैयक्तिक माहिती पाठवा
- तुम्हाला लॉटरी लागली आहे, बोनस मिळाला आहे
- कामाचे टास्क पूर्ण करा, चांगले कमिशन देतो
- ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, मोठा नफा मिळवून देऊ
- बाजारभावापेक्षा स्वस्तात वस्तू ऑनलाइन मिळवा
- आर्थिक मदतीची गरज आहे, असे भासवून
- टेलिग्रामवर फ्रिगेम टास्क देणे
- व्हॉटस्ॲप छायाचित्र व नाव वापरून लोकांना पैसे मागणे
- लष्करात आहे, बदली झालीय, साहित्य विकायचंय सांगून
- तुमच्या नावाने कुरिअर पाठविले आहे, त्यात ड्रग्ज आहेत, पोलिसांशी संपर्क करा, असे सांगून घाबरवणे
- न्यायालयाची नोटीस तुम्हाला आलेली आहे असे सांगून

काय करावे, काय करू नये


- अनोळखी व्यक्तींच्या लिंकला क्लिक करू नये
- कोणतेही ॲप इन्स्टॉल करू नये
- पैसे पाठविण्याच्या अगोदर खात्री करून घ्यावी
- जो व्यवसाय करायचाय, तो कायदेशीर आहे का बघावे
- ज्या खात्यावर पैसे पाठवायचे, त्याचा व बोलणाऱ्या व्यक्तीचा संदर्भ तपासून घ्यावा

online fraud
देशात २.७४ लाख कोटी रुपयांचा रेमिटन्स; अमेरिकेतून १.९१ लाख कोटी, तर ब्रिटनमधून ८३ हजार कोटी

ॲप डाऊनलोड केल्याने साडेसात लाखाचा घात


पिंपरीतील नीरज नरेंद्र जोगळेकर (वय २६, रा. महिंद्रा सेट्रॉलिस, पिंपरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या क्रमांक धारक व्यक्तीने जोगळेकर यांना त्यांच्या @iamnnj या ट्विटर अकाऊंटवर संदेश पाठवला. ॲक्सिस बॅंकेचे केवायसी व्हेरीफिकेशन करण्यासाठी anydesk नावाचे ॲप मोबाईलवर डाउनलोड करायचे सांगितले. त्या ॲपद्वारे पॅनकार्ड दाखवून प्रोसिस केली. थोड्या वेळाने जोगळेकर यांना त्यांच्या मोबाईलवर एचडीएफसी बॅंकेचा मेसेज आला. त्या डेबिट कार्डमधून आधी पाच लाख ५६ हजार आणि नंतर एक लाख ९१ हजार असे दोन वेळा सात लाख ४८ हजार ३३३ रुपये बॅंक अकाऊंटमधून लोन काढल्याचा संदेश आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे. अवघ्या दहा मिनिटांमध्ये हा प्रकार घडला.

‘‘कोणत्या तरी आमिषाला बळी पडून सायबर गुन्हेगारीचे प्रकार घडत आहेत. यात फसवणूक करणारी समोरील व्यक्ती आपल्याला दिसत नाही. त्यामुळे कशावरही विश्वास ठेऊ नका. मोबाईलवर आलेला मेसेज, लिंक क्लिक करू नका. अशा स्वरूपाचे व्यवहार करताना खात्री करा. सावधानता बाळगा. शंका किंवा संशय घेऊन व्यवहार केल्यास अनेक प्रश्न उपस्थित होतात. कारण, अनेकदा विश्वास संपादन करून फसवणूक केली जाते. ती टाळण्यासाठी कशावरही विश्वास ठेऊ नका. आधी खात्री करा. फसवणूक झाल्यास cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी.


- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड

online fraud
Share Market Closing: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात चौफेर खरेदी; सेन्सेक्समध्ये 634 अंकांची वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.