Bank Clinic: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणतीही तक्रार एकाच पोर्टलवर करता येणार

Bank Clinic: ग्राहकांना त्यांचे हक्कांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बँक कर्मचारी बँक क्लिनिक, तक्रार निवारण मंच सुरू करण्यासाठी एकत्र आले आहेत. Banksclinic.com ही एक वेबसाइट आहे जिथे किरकोळ ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात.
Bank Clinic
Bank ClinicSakal
Updated on

Bank Clinic: ग्राहकांना त्यांच्या हक्कांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी बँक कर्मचारी बँक क्लिनिक, तक्रार निवारण मंच सुरू करण्यासाठी एकत्र आले आहेत. Banksclinic.com ही एक वेबसाइट आहे जिथे ग्राहक तक्रारी नोंदवू शकतात. ग्राहकांना पाच दिवसांच्या आत या प्रकरणाशी संबंधित नियामक मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्यात येईल. ग्राहकांच्या शंकांचे निराकरण करणे ही त्यांची जबाबदार नसून त्यांना उपलब्ध उपायांबद्दल मार्गदर्शन करणे हा या वेबसाइटचा उद्देश आहे.

बँक क्लिनिक कसे काम करते?

ग्राहकांना त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (AIBEA) बँक क्लिनिक सुरू केले आहे. या वेबसाइटवर ग्राहक त्याच्या तक्रारीचा तपशील भरू शकतो, तिकीट तयार करू शकतो आणि उपलब्ध उपायांबद्दल आणि आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल माहिती 5 दिवसांच्या आत मिळवू शकतो.

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, आमच्याकडे एक टीम आहे जी ग्राहकांना समस्येच्या निराकरणाबद्दल मार्गदर्शन करेल, परंतु आम्ही समस्या सोडवणार नाही. अनेकांना तक्रार कशी करावी हेच कळत नाही. किरकोळ ग्राहक banksclinic.com या पोर्टलवर तक्रारी नोंदवू शकतात.

Bank Clinic
Adani Group: एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाची खात्री; अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तुफान वाढ

डिजिटल ग्राहकांसाठी फायदेशीर

राजकिरण राय, मुख्य कार्यकारी, नॅशनल बँक ऑफ फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (NaBFID), कार्यक्रमाचे उद्घाटन करताना म्हणाले, मला ते दिवस आठवतात जेव्हा ते (AIBEA) तंत्रज्ञानाच्या विरोधात होते, म्हणून आम्हाला बँकेत पहिला संगणक बसवण्यासाठी दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात आली.

आणि आज ते अशा टप्प्यावर आले आहेत जिथे ते वेबसाइट लॉन्च करत आहेत. राय म्हणाले की, दोन प्रकारचे ग्राहक असतात. एक जो बँकेच्या शाखेत जातो आणि दुसरा डिजिटलवर विश्वास ठेवणारा. राय म्हणाले की दुसऱ्या ग्राहकाने कधीही बँकेच्या शाखेला भेट दिली नाही कारण ते मोबाईल आणि नेट बँकिंग प्लॅटफॉर्मवर आहेत. या ग्राहकांना हाताळणे कठीण आहे.

Bank Clinic
RBI Repo Rate: रिझर्व्ह बँक 7 जूनला रेपो दर करणार जाहीर; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सीईओ एमव्ही राव म्हणाले की, अशा परिस्थितीत बँक क्लिनिक खूप प्रभावी ठरेल. मला आनंद आहे की हा मंचा तक्रारींबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आत्तापर्यंत फक्त बँकच तक्रारी सोडवायची, त्यामुळे निदान आमच्या खांद्यावर हा भार पेलायला भागीदार असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.