Bank Holiday in July 2023: जुलै महिन्यात आहेत भरमसाठ सुट्या, ‘इतके' दिवस बँका राहणार बंद! गैरसोय टाळण्यासाठी पाहा यादी

जुलै महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.
Bank Holidays
Bank Holidays Sakal
Updated on

Bank Holiday in July 2023: आर्थिक वर्ष 2023-24 चा जून महिना संपत आला आहे आणि नवीन महिना काही दिवसात सुरू होईल. अशा स्थितीत जुलै महिना सुरू होण्यापूर्वीच भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

देशभरातील बँका जुलै 2023 मध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारसह सुमारे 15 दिवस बंद राहतील. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका खुल्या असतात.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद राहतील आणि काही प्रादेशिक सुट्ट्या राज्यानुसार आहेत. प्रादेशिक सुट्ट्यां संबंधित निर्णय राज्य सरकार ठरवतात. जुलैमध्ये बँकाना एकूण 15 दिवस सुट्ट्या असतील.

जुलै महिन्यात शनिवार आणि रविवार वगळून आठ सुट्ट्या आहेत. 5 जुलैपासून गुरु हरगोविंदजींच्या जन्मदिनी सुरू होईल आणि 31 जुलै रोजी हुतात्मा दिनाच्या सुट्टीसह समाप्त होईल. काही राज्ये वगळता भारतातील सर्व बँकांना या सुट्ट्या लागू होतील.

2000 रुपयांच्या नोटा जमा होत आहेत

दुसरीकडे, देशातील सर्व बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्या जात आहेत. मे महिन्यात RBI ने 2000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचे आदेश दिले होते. देशातील जनतेला या 2000 रुपयांच्या नोटा सप्टेंबर अखेरपर्यंत जमा करा, असे सांगण्यात आले होते.

ज्यावर सातत्याने काम सुरू आहे. अशा परिस्थितीत, जर जुलैमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करायच्या असतील तर अशा लोकांना बँकेच्या सुट्टीनुसार त्या बदलून घ्याव्या लागतील.

Bank Holidays
RBI Governor: कर्ज फसवणूक प्रकरणी उच्च न्यायालयाने RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांना बजावली नोटीस, काय आहे प्रकरण?

जुलै 2023 मधील बँकांच्या सुट्ट्यांची यादी?

  • 2 जुलै 2023: रविवार

  • 5 जुलै 2023: गुरु हरगोविंद सिंग जयंती (जम्मू, श्रीनगर)

  • 6 जुलै 2023: MHIP दिवस (मिझोरम)

  • 8 जुलै 2023: दुसरा शनिवार

  • 9 जुलै 2023: रविवार

  • 11 जुलै 2023 : केर पूजा (त्रिपुरा)

  • 13 जुलै 2023 : भानू जयंती (सिक्कीम)

  • 16 जुलै 2023: रविवार

  • 17 जुलै 2023 : यू तिरोट सिंग डे (मेघालय)

  • 21 जुलै 2023 : ड्रुकपा त्से-झी (गंगटोक)

  • 22 जुलै 2023: चौथा शनिवार

  • 23 जुलै 2023: रविवार

  • 29 जुलै 2023: मोहरम (जवळजवळ सर्व राज्यांमध्ये)

  • 30 जुलै 2023: रविवार

  • 31 जुलै 2023: हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)

बँकांना सुट्टी असताना अनेक महत्त्वाची कामे रखडतात. अशा परिस्थितीत, ग्राहक मोबाइल किंवा नेट बँकिंगद्वारे काही काम पूर्ण करू शकतात.


तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकता. याशिवाय UPI च्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करता येतात. तसेच तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएम वापरू शकता.

Bank Holidays
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.