Bank Holidays in April, 2024: या आठवड्यात तुम्हाला बँकेतील काही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात बँका तीन दिवस बंद राहू शकतात. म्हणजेच या संपूर्ण आठवड्यात बँकांमध्ये फक्त तीन दिवस काम असेल. या आठवड्यात काही सुट्ट्या आहेत आणि त्यासोबतच महिन्याचा दुसरा शनिवारही असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. या आठवड्यात गुढीपाडवा आणि ईदच्या सुट्या येणार आहेत. बँका कधी बंद राहणार आहेत ते पाहूया.
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिल म्हणजेच मंगळवारी देशभरात बँका बंद राहतील. याच दिवशी तेलुगू नववर्षही साजरे केले जाते. या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक शहरांमध्ये बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच हा दिवस नवरात्रीचा पहिला दिवस असेल. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हैदराबाद-आंध्र प्रदेश, हैदराबाद-तेलंगणा, मणिपूर, गोवा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
11 एप्रिल रोजी देशभरात ईद असल्याने त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी बँकांनाही अधिकृत सुट्टी असेल. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, हैदराबाद-आंध्र प्रदेश, हैदराबाद-तेलंगणा, मणिपूर, गोवा, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
या आठवड्यात, 13 एप्रिल हा शनिवार आहे आणि तो महिन्याचा दुसरा शनिवार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना पूर्ण सुट्टी असल्याने या दिवशीही बँका बंद राहतील. त्यामुळे या आठवड्यात बँकांमध्ये सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीच कामकाज होणार आहे.
ऑनलाइन बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील. अत्यावश्यक व्यवहारांसाठी ग्राहक त्यांचे बँकेतील काम बँकांच्या वेबसाइट, मोबाइल ॲप्स किंवा एटीएमद्वारे करू शकतात. कोणत्याही कामासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या सहाय्याची आवश्यकता असल्यास, बँकेच्या सुट्टीच्या वेळापत्रकाची माहिती असणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.