Bank of Baroda Alert: बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना इशारा! 50 हजारांचे प्रकरण येईल अंगलट, खाते होईल रिकामे

Bank of Baroda Alert: बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
bank of baroda
bank of barodasakal
Updated on

Bank of Baroda Alert: तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. BoB ने आपल्या करोडो ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की काही व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक बनावट व्हिडिओ/पीडीएफ प्रसारित केरत आहेत.

ज्यात दावा केला जात आहे की तुमचे बँक ऑफ बडोदामध्ये खाते असल्यास, आता अर्ज करा आणि 50,000 रुपये विनामूल्य मिळवा. बँकेने म्हटले आहे की, बाजारात होणारे घोटाळे आणि अफवांपासून सावध रहा.

बँक ऑफ बडोदाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, नुकतेच बँक ऑफ बडोदा (BoB) कडून डिजिटल कर्ज दिले जात आहे, ज्यामध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या काही मिनिटांत 50,000 रुपयांचे कर्ज मिळवू शकता आणि या सुविधेचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरता येईल.

bank of baroda
Startup Success Story: शिक्षण सोडले, 19व्या वर्षी 'किराणा स्टोअर' उघडून उभारली 7,300 कोटींची कंपनी

बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना/ भागधारकांना अशा प्रकारच्या फसव्या योजनांना बळी पडू नये असे आवाहन करत आहे. कोणत्याही परिस्थितीत फसव्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होऊ नका.

bank of baroda
'SIP' मध्ये गुंतवणूक करताय? मग या गोष्टी लक्षात घ्या; योग्य गुंतवणूक देईल योग्य नफा

माहिती कोणाशीही शेअर करू नका

बँक तुम्हाला कधीही कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यास किंवा तुमचा OTP, PIN किंवा CVV क्रमांक शेअर करण्यास सांगत नाही.

तुमचे वैयक्तिक बँकिंग तपशील अनधिकृत किंवा संशयास्पद प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका. अधिकृत माहितीसाठी कृपया बँकेच्या वेबसाइट, BoB वर्ल्ड अॅप, शाखा किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.