Bank Employees Strike: बँक कर्मचारी डिसेंबरपासून 13 दिवस जाणार संपावर; काय आहे कारण?

Bank Employees Strike: बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
Bank Strike All India Bank Employee Association to go on strike from December 4; know the reason
Bank Strike All India Bank Employee Association to go on strike from December 4; know the reason Sakal
Updated on

Bank Employees Strike: बँक कर्मचारी डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 असे 13 दिवस संपावर जाणार आहेत. याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार 4 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत विविध तारखांना हा संप करण्यात येणार आहे. या काळात देशातील विविध बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

कोणत्या बँकेचा संप कोणत्या दिवशी?

ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशनच्या अधिसूचनेनुसार, डिसेंबर ते जानेवारी या सर्व तारखांना विविध बँकांमध्ये अखिल भारतीय संप होणार आहे.

डिसेंबरमध्ये 'या' तारखांना बँक कर्मचारी संप करणार

4 डिसेंबर - PNB, SBI आणि पंजाब अँड सिंध बँक

5 डिसेंबर- बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ इंडिया

6 डिसेंबर- कॅनरा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया

7 डिसेंबर- इंडियन बँक आणि युको बँक

8 डिसेंबर- युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र

11 डिसेंबर- खासगी बँकांचा संप

Bank Strike All India Bank Employee Association to go on strike from December 4; know the reason
RBIची बजाज फायनान्सवर मोठी कारवाई; कर्ज वितरणावर घातली बंदी, ग्राहकांवर काय परिणाम होणार?

जानेवारीत 'या' तारखांना संप होणार

2 जानेवारी- तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

3 जानेवारी- गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दादर, दमण आणि दीवमधील सर्व बँकांमध्ये संप असेल.

4 जानेवारी- राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील सर्व बँकांमध्ये संप.

5 जानेवारी- दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील सर्व बँकांमधील कर्मचाऱ्यांचा संप असेल.

6 जानेवारी- पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील सर्व बँकांचा संप.

19 आणि 20 जानेवारी- या दोन तारखांना देशभरातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत.

Bank Strike All India Bank Employee Association to go on strike from December 4; know the reason
LPG Cylinder: दिवाळीनंतर आनंदाची बातमी! गॅस सिलिंडर 57 रुपयांनी झाला स्वस्त, काय आहेत नवीन दर?

काय आहेत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

बँक कर्मचाऱ्यांनी तीन मागण्या केल्या आहेत. यातील पहिली मागणी आहे की, सर्व बँकांमध्ये पुरेशा प्रमाणात स्टाफची नियुक्ती करण्यात यावी. दुसरी मागणी म्हणजे बँकांमधील कायमस्वरूपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग बंद करण्यात यावे आणि तिसरी मागणी म्हणजे आउटसोर्सिंगशी संबंधित सेटलमेंटमधील तरतुदी आणि त्याचे उल्लंघन थांबवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.