RBI Order: बँकांच्या कर्जाबाबत RBIचा मोठा निर्णय, ग्राहकांना होणार मोठा फायदा

RBI on Property Document: मालमत्तेवरील कर्जाच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे.
RBI on Property Document
RBI on Property DocumentSakal
Updated on

RBI on Property Document: मालमत्तेवरील कर्जाच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या बाजूने मोठा निर्णय घेतला आहे. आता बँका, एनबीएफसी किंवा हाउसिंग फायनान्स कंपन्यांनी कर्जाची परतफेड केल्यानंतर मालमत्तेची कागदपत्रे परत करण्यास उशीर केल्यास ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. बुधवारी सकाळी रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात नवा आदेश जारी केला आहे.

रिझर्व्ह बँकेने लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, एनबीएफसी, गृहनिर्माण वित्त कंपन्यांसह सर्व व्यावसायिक बँकांना हा आदेश पाठवला आहे. रिझर्व्ह बँकेकडे तक्रारी येत होत्या की, ग्राहकांनी कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतरही, बँका आणि NBFC इत्यादी मालमत्ता कागदपत्रे देण्यास उशीर करतात. रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की, या दिरंगाईमुळे वाद आणि खटल्यासारखी परिस्थिती निर्माण होते.

आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये या संदर्भात स्पष्ट निर्देश दिले आहेत की जर ग्राहकाने मालमत्ता कर्जाचे सर्व हप्ते भरले किंवा कर्जाची पुर्तता केली, तर अशा परिस्थितीत त्याला तात्काळ मालमत्तेची कागदपत्रे मिळावीत.

RBI on Property Document
Yatra Online IPO: 15 सप्टेंबरला खुला होतोय यात्रा ऑनलाइनचा आयपीओ, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

रिझर्व्ह बँकेच्या आदेशात असे म्हटले आहे की सर्व नियमन केलेल्या संस्थांनी (व्यावसायिक बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका, एनबीएफसी कंपन्या इ.) ग्राहकांना सर्व मूळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर किंवा कर्ज सेटल केल्याच्या 30 दिवसांच्या आत दिली केली पाहिजेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कागदपत्रे संबंधित शाखेतून किंवा सध्या कागदपत्रे ठेवलेल्या शाखेतून किंवा कार्यालयातून गोळा करण्याचा पर्याय दिला जाईल.

कर्ज मंजुरीच्या पत्रात सर्व कागदपत्रे परत करण्याची तारीख आणि ठिकाण नमूद करण्याच्या सूचनाही सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. कर्ज घेणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत सर्व कागदपत्रे कायदेशीर वारसाला परत करण्याबाबत बँकांना प्रक्रिया ठरवावी लागेल आणि त्यांच्या वेबसाइटवर या प्रक्रियेची माहिती देखील प्रदर्शित करावी लागेल.

RBI on Property Document
Lemon Tree Hotels: लेमन ट्री हॉटेल्सच्या शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूक करावी का? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

5 हजार रुपये भरपाई

बँक किंवा इतर संबंधित संस्था निर्धारित वेळेत म्हणजे कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांच्या आत कागदपत्रे परत करू शकत नसतील, तर अशा परिस्थितीत त्यांना ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल.

बँका आणि संस्थांना आधी ग्राहकांना उशीर का झाला याची माहिती द्यावी लागेल. जर उशीर झाला, तर ग्राहकांना प्रत्येक दिवसासाठी 5,000 रुपये भरपाई द्यावी लागेल.

कागदपत्रांचे कोणतेही नुकसान झाल्यास, कागदपत्रे पुन्हा जारी करण्यात ग्राहकांना मदत करण्याची जबाबदारी बँका आणि संबंधित संस्थांची असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.