Bank Holiday: पुढील चार दिवस बँका राहणार बंद? बँकेशी संबंधित काम आजच पूर्ण करा

Bank Holiday: बँका आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. अनेक लोकांचे दररोज बँकांशी संबंधित काम असते. मग ते व्यापारी असोत किंवा कंपनी चालवणारे असोत, अशा लोकांची संख्या मोठी आहे. मात्र काही दिवस बँकांना सुट्टी असल्याने त्यांच्या कामावरही परिणाम होतो.
Banks to remain closed for three days in a row. Know details here
Banks to remain closed for three days in a row. Know details here Sakal
Updated on

Bank Holiday: बँका आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. अनेक लोकांचे दररोज बँकांशी संबंधित काम असते. मग ते व्यापारी असोत किंवा कंपनी चालवणारे असोत, अशा लोकांची संख्या मोठी आहे. मात्र काही दिवस बँकांना सुट्टी असल्याने त्यांच्या कामावरही परिणाम होणार आहे.

या आठवड्यात चार दिवस बँका बंद आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हीही बँकेशी संबंधित कोणत्याही कामाचे नियोजन करत असाल किंवा विचार करत असाल तर ही कामे लवकर पूर्ण करा.

Banks to remain closed for three days in a row. Know details here
HDFC Bank: दोन कोटी क्रेडिट कार्ड असणारी एचडीएफसी बनली देशातील पहिली बँक; कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी

बँकेला कोणत्या दिवशी सुट्टी?

या आठवड्यात तुमचेही बँकेत काही महत्त्वाचे काम असेल तर या कामात उशीर करू नका. कारण बँकेच्या सुट्टीचा कालावधी लवकरच सुरू होणार आहे. या आठवड्यात बँका एक-दोन नव्हे तर चार दिवस बंद राहणार आहेत.

विशेष म्हणजे देशभरात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. तर काही राज्यांमध्ये चार दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार बदलतात.

काही राज्यांमध्ये गुरुवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. म्हणजेच या दिवशी तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते तुम्ही करू शकणार नाही.

Banks to remain closed for three days in a row. Know details here
Income Tax: गेल्या 10 वर्षात ITR भरणाऱ्यांची संख्या झाली दुप्पट; जाणून घ्या किती वाढले कर संकलन?

या आठवड्यात चार दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. तारखांबद्दल बोलायचे झाले गुरुवार, 25 जानेवारी रोजी तामिळनाडूमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामागचे कारण म्हणजे थाईपुसम.

याशिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी 26 जानेवारी रोजी देशभरात बँकांना सुट्टी असेल. यानंतर चौथा शनिवार 27 जानेवारी आणि रविवारी 28 जानेवारीलाही बँकांना सुट्टी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.