Best Health Insurence Plans: आई-वडिलांचा आरोग्य विमा काढलाय का? जाणून घ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले फायदेशीर प्लॅन्स

Best Health Insurence Plans In India: या पॉलिसीमध्ये देशातील 270 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश आहे. यात रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्याला कोणतीही मर्यादा नाही.
Best Health Insurence Plans
Best Health Insurence PlansEsakal
Updated on

अलिकडील काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकजण वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहेत. वृद्धांमध्येही आजारांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर देशातील महागलेली आरोग्य सुविधा लोकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

अशात बाजारात असे काही आरोग्य विमा आहेत, जे तुमच्या वृद्ध आई-वडिलांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतात.

स्टार हेल्थ ॲश्युर इन्शुरन्स पॉलिसी

या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला तुमच्या 66 वर्षीय पुरुष आणि 61 वर्षीय महिलेसाठी 5 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर मिळते. 5 लाख रुपयांच्या या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 4643 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

या योजनेत देशातील 284 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश आहे. पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा 5000 रुपये प्रतिदिन आहे. (Star Health Assure Insurance Policy)

निवा बूपा हेल्थ रिअशुरन्स पॉलिसी

या आरोग्य वीमा पॉलिसीमध्ये 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेला वार्षिक 5 लाख रुपयांचा कव्हर मिळतो. 5 लाखांच्या या आरोग्य वीमा पॉलिसीसाठी तुम्हाला महिन्याला 4896 रुपयांचा प्रिमियम भरावा लागले.

या पॉलिसीमध्ये देशातील 270 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश आहे. यात रुग्णालयाच्या खोलीच्या भाड्याला कोणतीही मर्यादा नाही. (Niva Bupa Health Reinsurance Policy)

Best Health Insurence Plans
Post Office: पोस्ट ऑफिसची खास योजना! 2 लाख रुपये फक्त व्याज मिळेल, किती गुंतवणूक करावी लागेल?

डिजिट सुपर केअर ऑप्शन (डायरेक्ट)

डिजिट सुपर केअर ऑप्शन आरोग्य वीमा पॉलिसीमध्ये 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेसाठी वार्षिक पाच लाखांचे कव्हर उपलब्ध आहे.

5 लाख रुपयांच्या या प्लॅनसाठी तुम्हाला दरमहा 3150 रुपये प्रीमियम भरावा लागेल. या योजनेत 450 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याची मर्यादा नाही. (Digit Super Care Option Direct)

केअर सुप्रीम (सिनिअर सिटीझन)

या आरोग्य विमा योजनेत 66 वर्षांचा पुरुष आणि 61 वर्षांच्या महिलेसाठी 7 लाख रुपयांचे वार्षिक कव्हर उपलब्ध आहे. 7 लाख रुपयांच्या या पॉलिसीसाठी तुम्हाला दरमहा 3850 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

या योजनेत 219 कॅशलेस रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या पॉलिसीमध्ये सिंगल प्रायव्हेट एसी रूमही घेता येते. (Care Supreme Senior Citizen)

Best Health Insurence Plans
UPI Payment: आता तुमचा चेहरा पाहून होणार UPI ​​पेमेंट; फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.