म्युच्युअल फंड : उद्दिष्टपूर्तीचा राजमार्ग

प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन हवे असते. आयुष्यातील स्वप्ने, आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आवश्‍यक त्या रकमेची तरतूद केल्यास या सगळ्या गोष्टी करता येतात.
best investment in mutual fund sip financial planning money management
best investment in mutual fund sip financial planning money managementsakal
Updated on

- प्रांजली पाठक

प्रत्येकाला आर्थिक स्वावलंबन हवे असते. आयुष्यातील स्वप्ने, आवडीच्या गोष्टी करण्यासाठी आवश्‍यक त्या रकमेची तरतूद केल्यास या सगळ्या गोष्टी करता येतात. वेगवेगळ्या खर्चाची पूर्तता करण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्‍यक असते.

याकरिता योग्य आर्थिक नियोजनाची गरज असते. आर्थिक गुंतवणूक करताना म्युच्युअल फंड हा अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त पर्याय ठरला आहे. त्यातील लवचिकता, उत्‍तम परतावा या बाबी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवतात. रोख रकमेची काळजी न करता जे हवे ते करण्याचे स्वातंत्र्य देणारी परिस्थिती हे अनेकांना स्वप्न वाटेल, पण ते खरे ठरू शकते.

यासाठी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ‘फ्रीडम एसआयपी’ हा सोल्युशन-आधारित गुंतवणूकसाधन हा उत्तम पर्याय आहे.

वैशिष्ट्यपूर्ण ‘एसआयपी’ सुविधा

‘फ्रीडम एसआयपी’ नावाप्रमाणेच ‘एसआयपी’वरील अॅड-ऑन वैशिष्ट्य आहे. याचा वापर करून आठ वर्षे ते ३० वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. गुंतवणूकदारांना किती वर्षे ‘एसआयपी’ करायची आहे ते निवडण्याची लवचिकता असते. एकदा ही मुदत संपली, की गुंतवणूकदाराला मूळ ‘एसआयपी’ रकमेच्या पटीत दरमहा काही रक्कम मिळते.

एसआयपी’ व ‘एसडब्ल्यूपी’चा मिलाफ

‘फ्रीडम एसआयपी’ हा ‘एसआयपी’ (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) आणि ‘एसडब्ल्यूपी’ (सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅन) या दोन शक्तिशाली पद्धतशीर गुंतवणूक साधनांचा मिलाफ आहे. याचे तीन टप्पे आहेत. यामध्ये गुंतवणूकदार प्रथम ‘एसआयपी’द्वारे निर्धारित कालावधीसाठी युनिट जमा करतात. ‘एसआयपी’चा कार्यकाळ संपला, की जमा झालेला निधी कमी जोखीम असलेल्या योजनेत गुंतवला जातो. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात, दरमहा ठराविक पैसे काढण्याची योजना (एसडब्ल्यूपी) सुरू होते.

‘फ्रीडम एसआयपी’चा उद्देश गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करताना दुय्यम रोख प्रवाह मिळण्यास सक्षम करून गुंतवणुकीचा आनंददायक अनुभव देणे हे आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद घेण्याचा हा खरोखर एक प्रभावी राजमार्ग आहे.

(लेखिका म्युच्युअल फंड ड्रिस्टीब्युटर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.