best saving scheme invest 250 rupee per day in ppf and get 24 lakh on maturity full calculation
best saving scheme invest 250 rupee per day in ppf and get 24 lakh on maturity full calculation Sakal

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

दिवसाला २५० रुपयांची गुंतवणूक करुन २४ लाख रुपये कसे मिळणार.. जर तुम्ही दररोज २५० रुपये सेव्हिंग केले तर महिन्याकाठी तुमचे ७५०० रुपये होतात. ही रक्कम वर्षाला ९० हजार रुपये होते. पीपीएफमध्ये या पैशांची गुंतवणूक पंधरा वर्षे करावी लागणार आहे.
Published on

PPF Scheme : प्रत्येकजण आपल्या कमाईमधून काही ना काही बचत करत असतो आणि आपली बचत अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतो जिथे त्याचा पैसा सुरक्षित तर राहील, तसेच त्याचे रिटर्नदेखल चांगले मिळतील. आजघडीला शेकडो सेव्हिंग प्लॅन्स बाजारात आहेत. परंतु गुंतवणूकदाराला हवी असते ती विश्वासार्हता.

एका सरकारी स्कमीची सध्या चर्चा आहे. पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोव्हिडेंट फंड ही योजना लाँग टर्म गुंतवणुकीसाठी शानदार बेनिफिट्स देतेय. या स्कीममध्ये तुम्हाला दररोज २५० रुपये सेव्हिंग करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला २४ लाख रुपये मिळतील.

७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज आणि टॅक्समध्ये सवलत

पब्लिक प्रोव्हिडंट फंडामध्ये गुंतवणूक केल्यानंतर आकर्षक व्याज मिळत आहे. सोबतच गुंतवणुकीची खात्री खुद्द सरकारच देत आहे. PPF Interest Rate बद्दल सांगायचं झाल्यास गुंतवणुकीवर तुम्हाला ७.१ टक्के व्याज मिळतं. त्यासोबतच टॅक्समध्येही सवलत मिळते.

पीपीएफ स्कीम एक ईईई प्रकारातील स्कीम आहे. प्रत्येकवर्षी केली जाणारी गुंतवणूक ही टॅक्सफ्री असणार आहे. त्याशिवाय गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या व्याजासोबतच मॅच्युरिटीवर मिळणाऱ्या फंडावरही टॅक्स देण्याची गरज नाही.

best saving scheme invest 250 rupee per day in ppf and get 24 lakh on maturity full calculation
Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

२४ लाख रुपये कसे आणि कधी मिळणार?

फक्त २५० रुपयांची गुंतवणूक करुन २४ लाख रुपये कसे मिळणार ते पाहूया. जर तुम्ही दररोज २५० रुपये सेव्हिंग केले तर महिन्याकाठी तुमचे ७५०० रुपये होतात. ही रक्कम वर्षाला ९० हजार रुपये होते. पीपीएफमध्ये या पैशांची गुंतवणूक पंधरा वर्षे करावी लागणार आहे.

प्रत्येक वर्षाला ९० हजार म्हणजे पंधरा वर्षात जमा होतात १३ लाख ५० हजार रुपये. यावर ७.१ टक्के दराने व्याज मिळणार आहे. व्याजाची रक्कम १० लाख ९० हजार ९२६ रुपये होणार आहे. तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २४ लाख ४० हजार ९२६ रुपये मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.