Bharat Brand: दिवाळी अगोदर सर्वसामान्यांना मोठा झटका! 'भारत' ब्रँडचे पीठ, तांदूळ आणि डाळीही महागल्या, काय आहे किंमत?

Bharat Brand: दिवाळी अगोदर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. 'भारत' ब्रँडचे पीठ, 'भारत' ब्रँडचा तांदूळ आणि अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'भारत डाळ'च्या किमती वाढवल्या आहेत. नवीन दर आजपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Bharat Brand
Bharat BrandSakal
Updated on

Bharat Brand: दिवाळी अगोदर सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. 'भारत' ब्रँडचे पीठ, 'भारत' ब्रँडचा तांदूळ आणि अनुदानावर विकल्या जाणाऱ्या 'भारत डाळ'च्या किमती वाढवल्या आहेत. नवीन दर आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. आता 10 किलो 'भारत' ब्रँडचे पीठ 300 रुपयांना मिळणार आहे तर 10 किलो तांदळाची किंमत 340 रुपये आहे.

यापूर्वी 10 किलो पिठाची किंमत 275 रुपये होती, तर 10 किलो तांदळाची किंमत 290 रुपये होती. एवढेच नाही तर डाळीचे भावही वाढवले ​​जात आहेत. आता भारत ब्रँडची चणाडाळ 65 रुपयांऐवजी 70 रुपये किलोने मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.