Tata Group: टाटा समूह मोठी कंपनी विकणार? एअरटेल खरेदी करणार कंपनीतील हिस्सा; ग्राहकांना काय फायदा होणार?

Tata Group: टाटा समूहाच्या कंपन्या नफा कमावण्यासाठी ओळखल्या जातात. पण टाटा ग्रुपची डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) सेवा देणारी कंपनी टाटा प्ले सध्या तोट्यात आहे. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल टाटा प्ले खरेदी करण्यासाठी टाटा समूहाशी चर्चा करत आहे.
Tata Group
Bharti Airtel in advanced talks to acquire Tata Play Sakal
Updated on

Tata Group: टाटा समूहाच्या कंपन्या नफा कमावण्यासाठी ओळखल्या जातात. पण टाटा ग्रुपची डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) सेवा देणारी कंपनी टाटा प्ले सध्या तोट्यात आहे. सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेल टाटा प्ले खरेदी करण्यासाठी टाटा समूहाशी चर्चा करत आहे. हा करार एअरटेलला डिजिटल टीव्ही सेगमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यास मदत करू शकतो.

टाटा प्ले ही देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी आहे, परंतु बाजारपेठ वेगाने बदलत आहे. टियर 1 आणि टियर 2 शहरांमधील ग्राहक आता डीटीएच सेवांऐवजी होम ब्रॉडबँड आणि ओव्हर-द-टॉप (OTT) सेवांकडे वळत आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील ग्राहक दूरदर्शनच्या मोफत डिशचा पर्याय निवडत आहेत. या कारणांमुळे डीटीएच मार्केटमध्ये टाटा प्लेचा हिस्सा आणि नफा सातत्याने कमी होत आहे.

Tata Group
Pakistan Stock Exchange: पाकिस्तानच्या शेअर बाजारात काय घडतयं? भारताला मागे टाकून केला विक्रम
एअरटेल आणि टाटा यांच्यात दुसरा करार होणार

हा करार पूर्ण झाल्यास टाटा आणि एअरटेल यांच्यातील हा दुसरा मोठा करार असेल. 2017 मध्ये, एअरटेलने टाटाचा ग्राहक मोबिलिटी व्यवसाय विकत घेतला. सध्या एअरटेल ही DTH मार्केटमधील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

टाटा प्ले विकत घेतल्यास, एअरटेलचा मार्केट शेअर आणखी वाढेल आणि ते जिओच्या आक्रमक ऑफरशी स्पर्धा करतील. सध्या, टाटा समुहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची टाटा प्लेमध्ये 70% हिस्सेदारी आहे आणि वॉल्ट डिस्नेकडे 30% हिस्सा आहे. डिस्नेही या व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करत आहे.

टाटा प्लेचा DTH मार्केटमध्ये 32.7% हिस्सा आहे आणि 20.77 दशलक्ष सदस्य आहेत. भारती टेलिमीडिया 27.8% मार्केट शेअरसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर डिश टीव्ही 20.8% आणि सन टीव्ही डायरेक्ट 18.7% शेअरसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे.

टाटा प्ले ब्रॉडबँडचे सुमारे 4,80,000 ग्राहक आहेत आणि ते फायबर ब्रँड अंतर्गत सेवा देतात. एअरटेलचा डीटीएच व्यवसाय दक्षिण भारत, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आहे.

Tata Group
Nagpur: नागपूरमध्ये आशियातील सर्वात मोठी माल्ट डिस्टिलरी सुरू; 90 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

जर हा करार झाला, तर एअरटेलचे डीटीएच आणि ब्रॉडबँड विभागात स्थान मजबूत होईल. एअरटेल जिओच्या स्पर्धात्मक ऑफरशी अधिक चांगली स्पर्धा करू शकेल. यात ग्राहकांना स्वस्त दरात सेवा मिळण्याची शक्यता आहे.

कारण कंपनीतील स्पर्धांचा फायदा ग्राहकांना होणार आहे. कराराची चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.