'या' कंस्ट्रक्शन कंपनीला रेल्वेकडून मोठी ऑर्डर, वर्षभरात 755% परतावा...

Giriraj Civil Developer : एक्सचेंज फायलिंगनुसार, देशातील प्रसिद्ध सरकारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्सला उत्तर मध्य रेल्वे, ग्वाल्हेरकडून वर्क ऑर्डर मिळाली झाली आहे.
Big order from Railways for this construction company 755 return in a year
Big order from Railways for this construction company 755 return in a yearSakal
Updated on

सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनी गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्सला (Giriraj Civil Developers) शुक्रवारी मोठी ऑर्डर मिळाली आहे. एक्सचेंज फायलिंगनुसार, गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्सला उत्तर मध्य रेल्वेकडून 181.45 कोटीचे काँट्रॅक्ट मिळाले आहे. ऑर्डर मिळाल्याच्या बातमीनंतर स्टॉकमध्ये वाढ झाली आणि तो 4.76 टक्क्यांनी वाढून 385 च्या पातळीवर पोहोचला. गेल्या एका वर्षात या शेअरने शेअरहोल्डर्सना 755 टक्के इतका उत्कृष्ट परतावा दिला आहे.

एक्सचेंज फायलिंगनुसार, देशातील प्रसिद्ध सरकारी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर गिरिराज सिव्हिल डेव्हलपर्सला उत्तर मध्य रेल्वे, ग्वाल्हेरकडून वर्क ऑर्डर मिळाली झाली आहे. याअंतर्गत खजुराहो रेल्वे स्थानकाच्या अपग्रेडेशनचे काम कंपनीला मिळाले आहे. कंपनीला रेल्वे पूल, प्लॅटफॉर्म, स्टेशन बिल्डिंग, पोडियम पार्किंग, रेल्वे यार्ड, बिल्डिंग रस्ते, पूल, फूटओव्हर ब्रिज, आरसीसी रोड्स बांधण्याचा अनुभव आहे.

Big order from Railways for this construction company 755 return in a year
Investment Tips : 220 रुपयांपर्यंत जाईल 'हा' हॉटेल स्टॉक, स्टॉकबाबत तज्ज्ञ सकारात्मक...

गिरीराज सिव्हिल डेव्हलपर्सच्या स्टॉक रिटर्नबद्दल बोलायचे तर या आठवड्यात त्यात 1.32 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, गेल्या एका महिन्यात 27 टक्के, 3 महिन्यांत 29 टक्के आणि 6 महिन्यांत 8 टक्के घट झाली आहे. पण, गेल्या एका वर्षात याने शेअरहोल्डर्सना 755 टक्के मजबूत परतावा दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप 920.94 कोटी रुपये आहे.

Big order from Railways for this construction company 755 return in a year
Stock Investment : 'हा' शेअर दुप्पट करेल तुमची गुंतवणूक, कोणता आहे 'हा' शेअर ?

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.