PM Kisan : 'पीएम किसान'च्या चौदाव्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट; 'ही' कागदपत्रं तयार ठेवा

PM Kisan News
PM Kisan Newsesakal
Updated on

नवी दिल्लीः केंद्र सरकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदाव्या हप्त्याची तारीख लवकरच जाहीर होत आहे. हा हप्ता एप्रिल आणि जुलैच्या मध्ये येऊ शकतो. या योजनेचा तेरावा हप्ता २६ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी करण्यात आलेला होता.

१४व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे. यापूर्वी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. देशातील जमीनधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन-दोन हजार रुपये टाकले जातात. असे तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये शेतकऱ्यांना थेट मिळतात.

PM Kisan News
प्रवाशाची क्रू मेंबरला मारहाण! Air Indiaचं दिल्ली-लंडन विमान अर्ध्यातूनच परतलं

या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, नागरिकत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. यासह बँक खात्याचा तपशील आणि मोबाईल नंबरदेखील द्यावा लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेत आधीच अर्ज केला आहे त्यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये, 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली होती. 12 वा हप्ता 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिला होता. यामध्ये सुमारे 80 दशलक्ष शेतकऱ्यांना 16,000 कोटी रुपये देण्यात आले होते. आता तेराव्या हप्त्याचं वितरण झालेलं असून चौदाव्या हप्त्यासाठी अपडेट येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.