Income Tax: कर भरण्यात टाटा नंबर 1, 'या' 10 कंपन्यांनी भरली सर्वाधिक तिजोरी

2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने करातून भरपूर कमाई केली आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Income Tax: 2022-23 या आर्थिक वर्षात सरकारने करातून भरपूर कमाई केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय उद्योगांनी (इंडिया इंक) सरकारी तिजोरीत भरपूर भर घातली आहे. Ace इक्विटी डेटानुसार, BSE 500 कंपन्यांनी (BSE 500 Firms) गेल्या आर्थिक वर्षात 3.60 लाख कोटींहून अधिक कर भरला आहे.

टॉप-500 कंपन्यांनी भरला इतका कर

आकडेवारीनुसार, देशातील 500 सर्वात मोठ्या सूचीबद्ध कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कराच्या रूपात सरकारी तिजोरीत 3.64 लाख कोटी रुपयांचे योगदान दिले.

2021-22 या आर्थिक वर्षातील 3.41 लाख कोटी रुपयांच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 7 टक्के अधिक आहे. अशा प्रकारे सरकारला कॉर्पोरेट आयकरातून वर्षानुवर्षे अधिक उत्पन्न मिळत आहे.

टाटांच्या पुढे फक्त सरकारी कंपन्या

सर्वाधिक कर भरण्याच्या बाबतीत सरकारी कंपन्या अव्वल ठरल्या आहेत. सर्व सूचीबद्ध सरकारी कंपन्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मिळून 1.08 लाख कोटी रुपयांचा कर भरला आहे.

त्याचबरोबर खासगी कॉर्पोरेटमध्ये टाटा समूह पहिल्या क्रमांकावर आहे. टाटा समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीत 30,000 कोटी रुपयांहून अधिक योगदान दिले आहे. BSE-500 निर्देशांकात टाटा समूहाच्या एकूण 17 कंपन्यांचा समावेश आहे.

या कॉर्पोरेट समूहांचा टॉप-5 मध्ये समावेश

टाटा समूहानंतर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचा क्रमांक लागतो. अंबानींच्या रिलायन्स समूहाच्या कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 20,730 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे.

HDFC समूह रु. 20,300 कोटींच्या योगदानासह चौथ्या क्रमांकावर आहे आणि ICICI समूह रु. 12,800 कोटींच्या कर योगदानासह पाचव्या स्थानावर आहे. BSE-500 इंडेक्समध्ये HDFC ग्रुप आणि ICICI ग्रुप या दोन्ही कंपन्यांच्या 4-4 उपकंपन्यांचा समावेश आहे.

बजाज आणि वेदांत यांनीही तिजोरी भरली

बजाज समूहाच्या कंपन्यांनी गेल्या आर्थिक वर्षात एकत्रितपणे 10,554 कोटी रुपयांचा कर भरला आहे. अशाप्रकारे BSE-500 मध्ये 6 कंपन्यांसह बजाज समूह सर्वाधिक कर भरण्याच्या बाबतीत सहाव्या स्थानावर आहे.

अनिल अग्रवाल यांचा वेदांत समूह 10,547 कोटी रुपयांचा कर भरून सातव्या स्थानावर आहे. अनिल अग्रवाल यांच्या 2 कंपन्यांचा BSE-500 निर्देशांकात समावेश आहे.

Ratan Tata
Apple : अ‍ॅपलने रचला इतिहास! ठरली जगातील पहिली ३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅप असणारी कंपनी

बिर्ला कंपन्यांनी इतका कर भरला

कुमार मंगलम बिर्ला यांचा आदित्य बिर्ला समूह 10,100 कोटी रुपये भरून आठव्या स्थानावर आहे. नवव्या क्रमांकावर इन्फोसिस ही दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी होती.

ज्याने 9,200 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर भरला. तर अॅक्सिस बँक 7,768 कोटी रुपयांच्या कर भरणासह 10 व्या स्थानावर आहे.

Ratan Tata
Internet shutdown : खरोखरच इंटरनेट बंद केल्याने दंगली थांबतात का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.