Bill Gates: '100 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज...,' AI आणि नोकऱ्यांबद्दल काय म्हणाले बिल गेट्स?

'Today compared to 100 years ago...,' What did Bill Gates say on AI and jobs? : आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी हैदराबादमधील कंपनीच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटरला (आयडीसी) भेट दिली आणि एआयशी संबंधित संधींबद्दल चर्चा केली.
Bill Gates said on AI More jobs today than 100 years ago
Bill Gates said on AI More jobs today than 100 years agoSakal
Updated on

Bill Gates: आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी हैदराबादमधील कंपनीच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटरला (आयडीसी) भेट दिली आणि एआयशी संबंधित संधींबद्दल चर्चा केली. मायक्रोसॉफ्टने एका निवेदनात म्हटले आहे की गेट्स यांनी मंगळवारी IDC ला भेट दिली जिथे त्यांनी भारतातील काही अभियंत्यांशी संवाद साधला. मायक्रोसॉफ्ट आयडीसीचे एमडी राजीव कुमार म्हणाले की, एआयमुळे भारतात निर्माण होणाऱ्या संधींबाबत गेट्स आशावादी आहेत.

बिल गेट्स यांना नोकऱ्यांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “आज लोकांकडे 100 वर्षांपूर्वीपेक्षा जास्त नोकऱ्या आहेत. एक काळ असा होता की लोकांना एक वेळ खायला मिळावे म्हणून ते खूप कष्ट करायचे. तेव्हा 80 टक्के लोक शेतकरी होते. आधुनिकतेने आपल्या जीवनात समृद्धी आणली आहे. आम्ही कामाचे आठवडे कमी केले आहेत. आज आपल्याला जे अन्न मिळत आहे ते मागील पिढीच्या तुलनेत चांगले आहे.”

Bill Gates said on AI More jobs today than 100 years ago
Dolly Chaiwala: चहाचा लागला नाद अन् शाळा सोडली, बिल गेट्स ज्याचा फॅन झालाय तो डॉली चायवाला किती रुपये कमवतो?

AI बद्दल बोलताना बिल गेट्स म्हणतात, “भारतात AI बाबत खूप चांगले काम केले जात आहे. आणि जेव्हा ते गरीब लोकांच्या आरोग्यासाठी आणि शेतीसाठी मदत करेल, तेव्हा आमचे फाउंडेशन त्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही.”

भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या प्रश्नावर बिल गेट्स म्हणतात, “सरकारकडून पाठवले जाणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचत आहेत. त्यामुळे सरकारची मोठी बचत होत आहे. ज्याचा वापर इतर क्षेत्रात करता येईल.

Bill Gates said on AI More jobs today than 100 years ago
Tata Semiconductor Plant : भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी 'टाटा'ला ग्रीन सिग्नल; गुजरातमध्ये उभारणार पहिला प्लांट

तसेच बिल गेट्स यांनी गुरुवारी (29 फेब्रुवारी) नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पीएम मोदींशी कृत्रिम बुद्धिमत्ता, महिलांशी संबंधित विकासाच्या समस्या, कृषी, आरोग्य, हवामान बदल आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. बिल गेट्स यांनी X वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांची भेट नेहमीच प्रेरणादायी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.