World's Richest Prisoner Net Worth: जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंज बिनन्सचे संस्थापक चांगपेंग झाओला 4 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सायबर गुन्हेगार आणि दहशतवादी गटांनी त्याच्या एक्सचेंजवर व्यापार केला आहे असा आरोप त्याच्यावर आहे. 47 वर्षींचा चांगपेंग झाओ, काळ्या रंगाचा सूट आणि निळ्या रंगाची टाय घालून न्यायालयात पोहोचला. त्याला वकिलांनी वेढले होते. झाओच्या आई आणि बहिणीने कोर्टरूममध्ये बसून सुनावणी पाहिली आणि शेवटी चांगपेंगला 4 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
Binance हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्सचेंज आहे. या एक्सचेंजमध्ये 65 बिलियन डॉलरची सर्वाधिक क्रिप्टो मालमत्ता आहे. त्याचा संस्थापक चांगपेंग झाओ आहे. फोर्ब्सच्या मते, झाओची एकूण संपत्ती 3300 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 2.75 लाख कोटी रुपये आहे.
यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार, Binance होल्डिंग्स लिमिटेड, Binance.com ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज आहे. संस्थेने कबूल केले आहे की ते मनी लाँडरिंग, विना परवाना पैसे ट्रान्समिशन आणि नियमांचे उल्लंघन केले आहे. इतकेच नाही तर अमेरिकेच्या कॉर्पोरेट इतिहासातील कोणत्याही कार्यकारी अधिकाऱ्यावर लावण्यात आलेला हा सर्वात मोठा फौजदारी दंड आहे.
Binance ने KYC चेकशिवाय अब्जावधी डॉलर्सचे क्रिप्टो व्यवहार केल्याचा आरोप आहे. Binance wallets चे व्यवहार Hyrdra नावाच्या रशियन डार्कनेट मार्केटप्लेससह झाले आहेत. एफटीएक्स घोटाळ्याशी बिनन्सचे नावही जोडले जात होते. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी बिनन्सनेच काही माहिती लीक केल्याचा आरोप केला जात होता.
Binance च्या एका निवेदनात म्हटले आहे की, स्टार्टअप म्हणून सुरू झालेली ही कंपनी खूप वेगाने विकसित झाली आहे. कंपनी जितक्या वेगाने वाढली, तितक्या वेगाने ती स्वतःला अनुरूप बनवू शकली नाही आणि या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात, आम्ही काही चुकीचे निर्णय देखील घेतले आणि आम्ही या प्रकरणाची जबाबदारी घेतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.