India-Maldives Row: भारतासोबतचा वाद मालदीवला पडला महागात; दररोज 'इतक्या' कोटींचे नुकसान

India-Maldives Row: मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवला, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला.
India-Maldives Row
India-Maldives RowSakal
Updated on

India-Maldives Row: मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध नोंदवला, तर इतर देशांनीही भारताला पाठिंबा दिला.

दरम्यान, भारतातील लोक आणि अनेक बड्या व्यक्तींकडूनही मालदीववर संताप व्यक्त होत आहे. लोक मालदीवला भेट देण्याऐवजी लक्षद्वीपला जाण्याची चर्चा करत आहेत. यासोबतच लोक मालदीवचा बहिष्कार करत आहेत आणि अनेक परदेशी टूर बुकिंग एजन्सींनीही मालदीव पॅकेज बंद करण्याची घोषणा केली.

पर्यटकांच्या संख्येत घट

भारतासोबतचा वाद अधिक तीव्र झाल्यानंतर मालदीवला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. खुद्द भारतातील शेकडो लोकांनी त्यांच्या बुकिंग रद्द केल्या आहेत. यासोबतच मेक माय ट्रिप आणि इज माय ट्रिपने मालदीवसाठी त्यांचे बुकिंग रद्द केले.

भारत ही दुसरी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ

मालदीवसाठी भारत ही दुसरी सर्वात मोठी पर्यटन बाजारपेठ आहे. भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला भेट देतात. अलिकडच्या काही वर्षांत मालदीवच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय पर्यटकांचे योगदान वाढले आहे, त्यामुळे ते सर्वात जास्त आकर्षक पर्यटन ठिकाणांपैकी एक बनले आहे.

India-Maldives Row
PM Modi Nashik: भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये कसा आला? नाशिकमध्ये मोदींनी सांगितलं कारण

मालदीवला दररोज 8.64 कोटींचे नुकसान!

मालदीवच्या काही मंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याच्या पोस्टवर आक्षेपार्ह टीका केली. यावर नेटकऱ्यांनी बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू केला, याचा मालदीवला मोठा फटका बसत आहे. मालदीवला प्रतिदिन 8.6 कोटींचा तोटा सहन करावा लागत असल्याची बातमी समोर आली आहे.

India-Maldives Row
Budget 2024: मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?

भारतीयांनी तिथे जाणे बंद केल्यामुळे मालदीवचे प्रतिदिन 8.6 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अंवलबून आहे. त्यातच भारतातील पर्यटकांच्या बहिष्कारामुळे मालदीवची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत सापडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()