Factory Shutdown: 1947मध्ये सुरू झालेला ऐतिहासिक कारखाना होणार बंद; सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली VRS, काय आहे कारण?

Britannia Factory: FMCG क्षेत्रातील ब्रिटानिया कंपनी आपला एक कारखाना बंद करणार आहे, जो देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी 1947 मध्ये सुरु झाला होता. कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असलेला हा ऐतिहासिक कारखाना ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​सर्वात जुने उत्पादन युनिट आहे.
Britannia's Kolkata factory
Britannia's Kolkata factory Sakal

Britannia Factory: FMCG क्षेत्रातील ब्रिटानिया कंपनी आपला एक कारखाना बंद करणार आहे, जो देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी 1947 मध्ये सुरु झाला होता. कोलकाता, पश्चिम बंगाल येथे असलेला हा ऐतिहासिक कारखाना ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​सर्वात जुने उत्पादन युनिट आहे. ब्रिटानिया मेरी गोल्ड आणि गुड डे सारखी बिस्किटे बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनीच्या या कारखान्यात काम करणाऱ्या सर्व कायम कर्मचाऱ्यांनी व्ही.आर.एस. (स्वेच्छा सेवानिवृत्ती) घेतली आहे.

ब्रिटानिया बिस्किट कारखाना बंद होणे म्हणजे कोलकात्याच्या औद्योगिक इतिहासाचा अंत आहे. तरातळा येथे ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडचा हा ऐतिहासिक कारखाना आहे. आज हजारो कोटींची कंपनी असलेल्या ब्रिटानियाने 1892 मध्ये कोलकाता येथील एका छोट्या दुकानातून फक्त 295 रुपयांच्या गुंतवणुकीतून बिस्किटे बनवायला सुरुवात केली.

त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कंपनीचा व्यवसाय इतका झपाट्याने वाढला की तो प्रत्येक घराघरात पोहोचला. ही कंपनी ब्रिटीश उद्योगपतींनी सुरू केली होती आणि नंतर तिची कमान वाडिया कुटुंबाच्या हातात आली.

Britannia's Kolkata factory
Raghuram Rajan: गुंतवणूकदारांनो सावधान! रघुराम राजन यांचा गुंतवणुकीचा सल्ला देणारा व्हिडिओ व्हायरल; होऊ शकते लाखोंचे नुकसान

वाडिया कुटुंबात आल्यानंतर त्यांनी ब्रिटानिया बिस्किटे पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि 1910 मध्ये इलेक्ट्रिक मशीनच्या मदतीने बिस्किटे बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1921 मध्ये उत्पादन वाढवण्यासाठी कंपनीने औद्योगिक गॅस ओव्हन आयात करण्यास सुरुवात केली आणि जसजसा व्यवसाय वाढत गेला तसतसा 1924 मध्ये मुंबईत कारखाना सुरू झाला.

आज ब्रिटानिया इंडस्ट्रीजचा व्यवसाय जगातील 60 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. ब्रिटानियाचे भारतात 13 कारखाने आहेत. कंपनीचा वार्षिक महसूल 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Britannia's Kolkata factory
Gold Reserve: परकीय सोन्याचा साठा 6 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; रिझर्व्ह बँक भारतात सोने का आणत आहे?

कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?

कारखाना बंद केल्याने कोणत्याही कर्मचाऱ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तसेच हा कारखाना बंद पडल्याने कंपनीच्या व्यवसायावरही परिणाम होणार नाही.

हा जुना कारखाना चालवणे आता ब्रिटानियासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही, असा दावा अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. कोलकाता येथे असलेला हा कारखाना सुमारे 11 एकरांमध्ये पसरलेला आहे. कोलकाता पोर्ट ट्रस्टकडून त्याची भाडेपट्टी 2048 पर्यंत आहे. आतापर्यंत ब्रिटानियाने या जमिनीबाबत आपल्या योजनांची कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या ही जमीन 24 वर्षे ब्रिटानियाकडे राहील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com