ऐन सणासुदीला सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; का महाग होत आहेत काजू-बदाम?

निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात भांडवली नफा कर वाढवण्यात आला आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. त्यामुळे आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया सार्वकालिक नीचांकी पातळीवर गेला आहे. डॉलर महागल्याने आयात सुका मेवाही महाग झाला आहे.
Why Cashew And Almonds Are Becoming Expensive
Why Cashew And Almonds Are Becoming Expensive
Updated on

नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामुळ कही खुशी कहीं गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गोष्टींवर अर्थसंकल्पचा परिणाम झाला आहे आहे. या यादीमध्ये सुक्या मेव्याचा देखील समावेश आहे. बजेटचा परिणाम सुक्या मेव्यावरदेखील झाला आहे. कारण याचे दर आणखी महागले आहेत. (Budget 2024 Affect Dry Fruits Why Cashew And Almonds Are Becoming Expensive)

सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर आहे. कालच, रुपया घसरला आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 63.72 रुपयांवर स्थिरावला. इतर गोष्टींबरोबरच त्याचा परिणाम सुक्या मेव्यावरही दिसून येतो. सध्या बाजारात काजू, बेदाणे, बदाम, अक्रोड आदींचे भावही वाढले आहेत. त्यामुळे आगामी काळात मिठाईचे दर शक्यता तर आहेच पण ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांचा खिसा मोकळा होऊ शकतो.

Why Cashew And Almonds Are Becoming Expensive
Income Tax Budget 2024 : मध्यमवर्गीय करदात्यांना अर्थसंकल्पातून काय मिळाले?

या ड्रायफ्रुट्समागे महागडे डॉलर

व्यापाऱ्यांच्या मते रुपयाच्या तुलनेत परकीय चलन महाग झाले आहे. याशिवाय सुक्या मेव्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीच्या घाऊक सुक्या मेव्याच्या बाजारात खारी बाओलीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इराण, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशांतून सुक्या फळांचा पुरवठा केला जातो.

काजूच्या मागणीत वाढ

एका व्यापाराने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 दिवसांत काजूसह बदामाची मागणी वाढली आहे. सर्वाधिक मागणी काजूच्या चार नगांना आहे. याचा वापर मिठाईमध्ये होतो.

आगामी सणासुदीनिमित्त मिठाई बनवणाऱ्या बड्या कंपन्यांनी ड्रायफ्रुट्सची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे काजूच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Why Cashew And Almonds Are Becoming Expensive
Union Budget 2024: काय स्वस्त, काय महाग? निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते होणार नाराज, बजेटमध्ये काय आहे जाणून घ्या

काजू दक्षिण आफ्रिकेतून येतो

दिल्ली किराणा समितीचे अध्यक्ष नंद किशोर बन्सल म्हणाले की, काजूचा सर्वाधिक पुरवठा दक्षिण आफ्रिकेतून होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुरवठा खंडित झाल्याने कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला होता, त्यामुळे काजूच्या दरात वाढ झाली आहे. इराणी ममरा बदामाच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामागील कारण म्हणजे तेथील चलनातील चढउतार.

बाजारात भाव काय?

किरकोळ व्यापारी प्रवीण गोयल यांनी सांगितले की, गेल्या 20 दिवसांत 1,000 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या काजूची किंमत 1,200 रुपये किलो झाली आहे. इराणी ममरा बदामाची किंमत, जी पूर्वी 2,000 रुपये प्रति किलोने विकली जात होती, ती आता 2,600 रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत सुक्या मेव्याचे दर आणखी वाढू शकतात, असा दावा सूत्रांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com