Budget 2024: कॅप्टन निर्मला सीतारामन यांच्या टीमचे 6 चेहरे कोण आहेत? ज्यांनी तयार केले 2024 बजेट

Union Budget 2024 Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारचा हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प आहे.
Budget 2024
Union Budget 2024 UpdatesSakal
Updated on

Union Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा स्थापन झालेल्या सरकारचा हा पहिलाच सर्वसाधारण अर्थसंकल्प असून, दरवेळेप्रमाणेच याही वेळी सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाकडून विशेष अपेक्षा आहेत.

याचे कारण भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही आणि एनडीए आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. हा अर्थसंकल्प तयार करण्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन कॅप्टनच्या भूमिकेत असताना त्यांच्या टीममध्ये 6 दिग्गज चेहऱ्यांचा समावेश आहे. जाणून घेऊया या बजेट टीमबद्दल.

टीव्ही सोमनाथन

निर्मला सीतारामन यांच्या बजेट टीममधील पहिले नाव अर्थ मंत्रालयातील सर्वात वरिष्ठ सचिव टीव्ही सोमनाथन यांचे आहे. ते तामिळनाडू केडरचे 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सोमनाथन यांच्याकडे सध्या वित्त सचिव आणि खर्च विभागाचे सचिवपद आहे.

ते पीएम मोदींच्या जवळचे मानले जातात आणि टीव्ही सोमनाथन यांनी एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2017 पर्यंत पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) काम केले.

अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या सोमनाथन यांनी अर्थशास्त्रावर 80 हून अधिक शोधनिबंध आणि लेख प्रकाशित केले आहेत. पीएमओ व्यतिरिक्त त्यांनी जागतिक बँकेतही काम केले आहे.

अजय सेठ

बजेट टीमचे दुसरे नाव आहे कर्नाटक केडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी अजय सेठ, जे सध्या वित्त मंत्रालयात आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत.

सेठ हे भारताचे पहिले सार्वभौम हरित रोखे जारी करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा वित्त सचिवालयाच्या निर्मितीसाठी देखील ओळखले जातात. गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 परिषदेत ते चर्चेत होते.

तुहीन कांत पांडे

तुहिन कांत पांडे हे देखील निर्मला सीतारामन यांच्या टीमचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते सध्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव आहेत. तुहिन कांत हे 1987 च्या बॅचचे ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी आहेत.

एअर इंडियाचे खाजगीकरण आणि LIC च्या देशातील सर्वात मोठ्या IPO मध्ये त्यांनी बजावलेल्या भूमिकेसाठी त्यांची ओळख आहे.

संजय मल्होत्रा

निर्मला सीतारामन यांच्या टीममधील पुढचे नाव आहे संजय मल्होत्रा, राजस्थान केडरचे 1990 बॅचचे अधिकारी, जे सध्या महसूल सचिव आहेत. याआधी ते वित्तीय सेवा विभागाचे प्रमुख होते.

अंतरिम बजेट प्रक्रियेत कर महसूल वाढवण्याची जबाबदारी संजय मल्होत्रा ​​यांच्या खांद्यावर होती. याशिवाय अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा भाग दोनचा मसुदा तयार करण्याच्या कामात त्यांचा सहभाग आहे.

व्ही अनंत नागेश्वरन

टीमचे पुढील सदस्य व्ही अनंत नागेश्वरन आहेत, जे लेखक आणि शिक्षक देखील आहे. ते भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. नागेश्वरन यांची गणना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या जवळच्या सल्लागारांमध्ये केली जाते.

कोणत्याही जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो यावर ते बारीक लक्ष ठेवून असतात. भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G20 बैठकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

विवेक जोशी

अर्थमंत्री सीतारामन यांच्या सल्लागार टीममध्ये विवेक जोशी यांचे नाव नवीन आहे. हरियाणा केडरचे 1989 बॅचचे IAS अधिकारी असलेले जोशी नोव्हेंबर 2022 मध्ये वित्त मंत्रालयात वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून रुजू झाले आहेत.

जिनेव्हा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी घेतलेले विवेक जोशी यापूर्वी भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.