Budget 2024: जेव्हा देशाचा पहिला अर्थसंकल्प झाला होता लीक तेव्हा काय झाले? वाचा एका क्लिकवर

Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची गुप्तता राखणे हे सरकारसाठी सर्वात महत्वाचे काम असते. पण तुम्हाला माहिती आहे का देशाचा पहिला अर्थसंकल्प लीक झाला होता...
Budget
BudgetSakal
Updated on

Budget 2024: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज वार्षिक आर्थिक अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पाची गुप्तता राखणे महत्वाचे काम असते. परंतु तुम्हाला माहिती आहे देशाचा पहिला अर्थसंकल्प लीक झाला होता. माजी पंतप्रधान पंडित यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी जवाहरलाल नेहरूंच्या सरकारमध्ये ते सादर केले होते. यानंतर 1950 मध्ये जेव्हा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा तोही लीक झाला. त्यामुळे तत्कालीन अर्थमंत्र्यांनाही राजीनामा द्यावा लागला होता.

वास्तविक स्वातंत्र्यापुर्वी पहिले अर्थमंत्री शानमुखम चेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी याची सुरुवात केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 3 महिन्यांनंतरचा हा अर्थसंकल्प होता, जो मार्च 1948 साठी होता. हा अर्थसंकल्प 171.15 कोटी रुपयांचा होता आणि त्यावेळी वित्तीय तूट 24.59 कोटी रुपये होती.

संसदेत मांडण्यापूर्वीच ब्रिटनचे अर्थमंत्री डाल्टन यांनी एका पत्रकाराला अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या करांमधील बदलांची माहिती दिली होती आणि संसदेत मांडण्यापूर्वीच हा सर्व तपशील वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. यानंतर डाल्टन यांना राजीनामा द्यावा लागला.

Budget
Budget 2024 Session Updates : बजेटमध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाला - सुप्रिया सुळे

अमर उजालामध्ये दिलेल्या अहवालानुसार, भारताचा 1950-51 साठीचा पहिला अर्थसंकल्प 3 मार्च रोजी सादर करण्यात आला होता आणि तोही लीक झाला होता. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांनी त्याची माहिती दिली होती. त्यावेळी राष्ट्रपती भवनात अर्थसंकल्प छापला गेला आणि तेथून तो फुटला.

छपाईच्या वेळी बजेट लीकमुळे त्याची छपाईची जागा बदलून मिंटो रोड येथील सरकारी छापखान्यात करण्यात आली. बजेट लीक झाल्यामुळे अर्थमंत्री मथाई यांना राजीनामाही द्यावा लागला होता. धनदांडग्यांच्या फायद्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे आरोप झाले होते.

विशेष म्हणजे अर्थसंकल्पात व्यावसायिक नफा कर रद्द करण्यात आला होता. जनतेवर कोणताही कर लादला नव्हता . त्यावेळी जनतेवर कोणताही कर लादला गेला नाही आणि सरकारचे म्हणणे होते की देशात जास्तीत जास्त संसाधने उभारली पाहिजेत आणि संरक्षण संबंधित खर्चात कपात केली गेली.

आयकर कमी करण्याची तरतूदही करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर पोस्ट आणि तारांचे दरही सुधारण्यात आले होते, जेणेकरून जनतेवर कोणताही आर्थिक भार पडू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()