Budget 2024: मोठी बातमी! आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार?

Budget 2024: निवडणुकीपूर्वी सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कव्हरेज वाढवू शकते. सध्या सरकार उपचारासाठी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देते.
Budget 2024
Budget 2024Sakal
Updated on

Budget 2024: निवडणुकीपूर्वी सरकार अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देऊ शकते. सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कव्हरेज वाढवू शकते. सध्या सरकार उपचारासाठी प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देते.

आता सरकार आरोग्य विमा संरक्षण 50% वाढवू शकते. तशा सूचना सरकारला अर्थसंकल्पात देण्यात आल्या आहेत. जर सरकारने आरोग्य विमा कवच 50 टक्क्यांनी वाढवले ​​तर हा विमा 7.50 लाख रुपयांपर्यंत वाढेल. असे वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे.

मोदी सरकार 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात सरकार ही घोषणा करू शकते. आयुष्मान भारत विमा वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्प 2024 मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे, तरीही अंतिम निर्णय घेणे बाकी आहे.

Budget 2024
2000 Rs Note: 12 जानेवारीपासून मुंबईच्या RBI कार्यालयातून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार नाहीत

आयुष्मान भारत योजना काय आहे?

आयुष्मान भारत ही मोदी सरकारची महत्त्वाची योजना आहे. जन आरोग्य योजना किंवा PM-JAY ही जगातील सर्वात मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक आहे. ग्रामीण भागात PMJAY आरोग्य कवच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची कुटुंबे आणि 16 ते 59 वर्षे वयोगटातील कुटुंबांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे.

आयुष्मान कार्ड

आतापर्यंत 25.21 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत आणि लवकरच ही संख्या 30 कोटींहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. योजनेअंतर्गत 5.68 कोटींहून अधिक नोंदणीकृत रुग्णालये आहेत. आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सेवा देण्यासाठी 26,617 रुग्णालयांचे नेटवर्क तयार करण्यात आले आहेत.

Budget 2024
PM Modi Nashik: भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये कसा आला? नाशिकमध्ये मोदींनी सांगितलं कारण

आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत वेबसाइट mera.pmjay.gov.in वर लॉग इन करा.

  • आता स्क्रीनवर दिलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

  • नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवलेला OTP टाका, तो तुम्हाला PMJAY लॉगिन स्क्रीनवर घेऊन जाईल.

  • आता तुम्ही ज्या राज्यातून या योजनेसाठी अर्ज करत आहात ते राज्य निवडा

  • त्यानंतर मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर निवडा.

  • 'कौटुंबिक सदस्य' टॅबवर क्लिक करून लाभार्थ्यांची माहिती तपासता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.